एक्स्प्लोर

Maharashtra Rain : उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार, मात्र, मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा

उद्यापासून (18 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे.

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार 14 सप्टेंबरपर्यंत अपेक्षित असलेला महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढीव तीन दिवस म्हणजे 15, 16 आणि 17 सप्टेंबरपर्यंत व्यापक वातावरणीय प्रणालीमुळं टिकून राहिला. परंतू यापुढे पावसाचा अंदाज नेमका कसा असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. उद्यापासून (18 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.

मुंबईसह संपूर्ण कोकणात पाऊस पडण्याची शक्यता

आता यापुढं कोकण, विदर्भ वगळता, मराठवाड्यात आजपासूनच आठवडभर तर मध्य महाराष्ट्रात 18 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. शुक्रवार ( 23 सप्टेंबरपर्यंत) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवत आहे. असे असले तरी, मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्ह्यात मात्र जोरदार पडत असलेल्या पावसाचे सातत्य आणि शक्यता अजूनही कायम आहे. कदाचित सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत तीव्रता टिकून राहण्याची शक्यता जाणवत आहे. विदर्भात येत्या दोन ते तीन दिवस जरी सध्या काहीशी उघडीप जाणवली तरी सोमवार (19 सप्टेंबरपासून) पुन्हा विखुरलेल्या स्वरुपात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. 

दरम्यान, शनिवार (24 सप्टेंबरपासून) कदाचित पुढील सहा दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत (29 सप्टेंबर ) संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाट व गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले. राजस्थानमधील वायव्य टोकाच्या भागात परतीच्या पावसाचे वेध लागण्याची शक्यता असली तरी सप्टेंबर महिना अखेरीस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाऱ्यांची दिशा बदलून परतीच्या पावसाचे वारे वाहू लागतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात कशामुळं एवढा पाऊस कोसळला?      

आजपासून पुढील चार दिवस (19 सप्टेंबरपर्यंत) हिमालयातील बद्री-केदार पर्यटकांना  हिमालय चढाईत घातक विजा, गडगडाटसह अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार पर्यटकांनी नियोजनात बदल करावा असे खुळे यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसात मान्सूनचा आस त्याच्या मूळ सरासरीच्या जागेपासून खूपच दक्षिणेकडे सरकल्यामुळं पाऊस पडत आहे. आठवड्यापूर्वी शुक्रवारी (9 सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीसमोर तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे तसेच त्याचे वायव्य दिशेकडे देशाच्या मध्य भू-भागावर  झालेल्या मार्गक्रमणामुळं हा जोरदार पाऊस कोसळला आहे.  
 

महत्त्वाच्या बातम्या:

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget