एक्स्प्लोर

Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Pune Crime News: पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.

Pune Crime News: पुण्यातून (Pune) एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खराडीजवळील (Kharadi) नदीपात्रात नवजात चिमुकलीचा (Newborn Baby Girl) मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

जन्मानंतर अज्ञात व्यक्तीने या नवजात अर्भकाला नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नदीपात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी (Wagholi Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनेची माहिती घेतली.

Pune Crime News: नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह

मृत अर्भक स्त्री जातीचे (Female Infant) असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या चिमुकलीचा जन्म नुकताच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जन्मानंतर अज्ञात व्यक्तीने तिला नदीत फेकून दिले असावे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नदीपात्रात मृतदेह असल्याची खात्री केली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली.

Pune Crime News: जीवरक्षकांनी बोटीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला

नदीपात्रात मृतदेह असल्याची खात्री झाल्यानंतर शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशनचे जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांनी बोटीच्या साहाय्याने नदीत उतरून नवजात अर्भकाचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर नवजात चिमुकलीचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

Pune Crime News: अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू

या घटनेनंतर वाघोली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. नवजात चिमुकलीला जन्म दिल्यानंतर नदीत कोणी आणि कोणत्या कारणातून फेकून दिले, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील माहिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमागील नेमकं कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना

Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात भरपूर हुंडा दिला, तरीही पैशांसाठी तगादा लावला, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी
लग्नात भरपूर हुंडा दिला, तरीही पैशांसाठी तगादा लावला, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी
Baramati Crime : थरकाप उडवणारी घटना! गरोदर महिलेवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; दोन तासांत आरोपीला बेड्या
थरकाप उडवणारी घटना! गरोदर महिलेवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; दोन तासांत आरोपीला बेड्या
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget