एक्स्प्लोर
नागपूर पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजनेला चोरट्यांचा ठेंगा
नागपूर पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजनेला नागपूरचे चोरटे वारंवार धक्का देत आहेत. कारण 'सेफ अॅण्ड स्मार्ट नागपूर' या योजनेअंतर्गत सर्व मुख्य रस्ते, चौक आणि जास्त गुन्हे प्रमाण असलेल्या भागात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. पण हे कॅमेरे चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
![नागपूर पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजनेला चोरट्यांचा ठेंगा The Cctv Service Plan Of The Nagpur Police Is A Waste Of Time By Thieves नागपूर पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजनेला चोरट्यांचा ठेंगा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/07212132/cctv.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूर पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स योजनेला नागपूरचे चोरटे वारंवार धक्का देत आहेत. कारण 'सेफ अॅण्ड स्मार्ट नागपूर' या योजनेअंतर्गत सर्व मुख्य रस्ते, चौक आणि सर्वाधिक गुन्ह्यांचं प्रमाण असलेल्या भागांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरु आहे. पण हे कॅमेरे चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
दोनच महिन्यांपूर्वी अनंतनगर भागात लावण्यात आलेले दोन अत्याधुनिक कॅमेरे चोरीला गेले होते. तर आता नरेंद्रनगर भागात दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तब्बल सात बॅटरी चोरीला गेल्या आहेत.
विशेष म्हणजे, बॅटरी चोरीला गेलेल्या दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी खांबावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ठेवले आहेत. पण त्याच्या डीपीमधून अत्यंत महागड्या बॅटरीज चोरुन नेल्या आहेत. याप्रकरणी अजनी पोलीस पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, ज्या नरेंद्रनगर भागात या चोऱ्या झाल्या आहेत तो परिसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी लावलेले कॅमरे आणि संबंधित यंत्रणाच आता चोरीला जात असल्यामुळे नागपुरात विविध चर्चांना ऊत आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)