एक्स्प्लोर
ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, अॅक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेत वळवणार
भाजप सत्तेपासून दूर राहिल्यानंतर अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या ट्विटची मालिका सुरु केली आहे. त्यामुळं साहजिकच शिवसेना नाराज आहे. मात्र अमृता फडणवीसांच्या या राजकीय भूमिकेची मोठी किंमत, त्या अधिकारी असलेल्या अॅक्सिस बँकेला मोजावी लागत आहे.
मुंबई : मिसेस फडणवीस आणि शिवसेनेमधल्या राजकीय कलगीतुऱ्यामुळं अडचणीत आलेल्या अॅक्सिस बँकेला अजून एक मोठा फटका बसला आहे. अॅक्सीस बँकेतील महाराष्ट्र पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्यात येणार असल्याची शक्यता असताना आता ठाणे महागरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिका अॅक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवणार आहे.
भाजप सत्तेपासून दूर राहिल्यानंतर अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या ट्विटची मालिका सुरु केली आहे. त्यामुळं साहजिकच शिवसेना नाराज आहे. मात्र अमृता फडणवीसांच्या या राजकीय भूमिकेची मोठी किंमत, त्या अधिकारी असलेल्या अॅक्सिस बँकेला मोजावी लागत आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी गुरूवारी (26 डिसेंबर) तातडीची बैठक घेऊन खाते राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
अॅक्सिस बँकेत सध्या ठाणे महानगपालिकेतील एलबीटीचे खाती, टॅक्स खाती आणि कर्मचाऱ्यांचे पगार अशी खाती सध्या अॅक्सिस बँकेत आहे. आता ही सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस खात्यातील 2 लाख कर्मचाऱ्यांची सॅलरी अकाऊंट अॅक्सिस बँकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून अॅक्सिस बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. मात्र हे पोलीस खातेदार अॅक्सिस बँकेला गमवावे लागू शकतात.
अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत वेस्टर्न इंडियाच्या कॉर्पोरेट हेड म्हणून काम करायच्या. 2014 साली पती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच आदेशानं पोलिसांची खाती राष्ट्रीयकृत बँकेतून अॅक्सिसमध्ये वळवल्याचा आरोप होता. नागपूरस्थित सामाजिक कार्यकर्ता मोहनिश जबलपुरे यांनी या प्रकरणी ऑगस्टमध्येच ईडीकडे तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये फडणवीसांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन अॅक्सिस बँकेत पोलिसांची पगार खाती वळवल्याचा आरोप केला आहे. तसंच यामुळे सरकारी बँक असलेल्या एसबीआयचा मोठा तोटा झाल्याचंही जबलपुरेंनी म्हटल आहे.
दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांची पगार खाती राष्ट्रीयकृत बँकात ठेवण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमत झालं आहे. त्यात अमृता फडणवीस यांचे राजकीय ट्वीट्समुळे शिवसेना नाराज आहे. त्यामुळे सरकारी बँकांना वर्षाला 11 हजार कोटीची उलाढाल करण्याची संधी देऊन राजकीय इमेज बनवण्याचाही नव्या सरकारचा प्रयत्न असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement