Thackeray Victory Rally: 20 वर्षांपूर्वी दुरावलेले भाऊ पुन्हा आज एकत्र; ठाकरेंच्या मेळाव्याची सोशल मीडियावर तुफान हवा, आगामी निवडणुकीबाबत राज-उद्धव यांनी एकत्र राहावं का? नेटकऱ्यांना काय वाटतं?
Thackeray Victory Rally: एबीपी माझाने सोशल मिडीयावरती याबाबतचा पोल घेतला होता, त्यामध्ये राज्यातील मराठी लोकांना काय वाटतं ते जाणून घेऊया पोलच्या आकडेवारीतून

मुंबई: आज संपूर्ण राज्याचं लक्ष हे मुंबईमधील वरळी डोम येथील ठाकरेंच्या विजयी मेळाव्याकडे लागलं आहे. तब्बल 18 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. भावांच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याची सर्वांचा उत्सुकता लागली आहे. हिंदीच्या मुद्यावर ठाकरी तोफा धडाडणार आहेत. मराठी अस्मितेसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असले तरीसुद्धा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज घडणारी ही सर्वात मोठी घडामोड आहे. दरम्यान आता सोबत येत असलेले ठाकरे बंधू हे आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का? असा सवाल उपस्थित झालेला आहे. त्या अनुषंगाने एबीपी माझाने सोशल मिडीयावरती याबाबतचा पोल घेतला होता, त्यामध्ये राज्यातील मराठी लोकांना काय वाटतं ते जाणून घेऊया पोलच्या आकडेवारीतून:
आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का?
(updated time 10:30am)
X Results
होय : 72.9%
नाही : 15.6%
माहिती नाही : 11.5%
एकूण मतं : 347
YouTube Results
होय : 91%
नाही : 6%
माहिती नाही : 3%
एकूण मतं : 29,000
Instagram Results
होय : 74%
नाही : 16%
माहिती नाही : 11%
एकूण मतं : 2,850
Facebook Results
होय : 100%
नाही : 0%
माहिती नाही : 0%
एकूण मतं : 20
WA Results
होय : 301
नाही : 47
माहिती नाही : 20
एकूण मतं : 368
स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे
मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच आता या मेळाव्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील, भाषणं फक्त 4 जणं करतील ऐनवेळी एकादा चेहरा वाढेल, अशी माहिती मिळत आहे.























