एक्स्प्लोर

नाशिक, परभणीमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे, महाविकासआघाडीला नवीन भगदाड; राऊत दौऱ्यावर असतानाच 50 जणांचा जय महाराष्ट्र

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

मुंबई:   नाशिकमध्ये (Nashik News) शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड  पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सकाळी 9 वाजता मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत होणार प्रवेश होणार आहे. तर परभणीत महाविकासआघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात जाणार आहे. ठाकरे गट आणि महविकासआघाडीला हा मोठा धक्का मानला जातो.  

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे  यामध्ये  विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

संजय राऊत आज दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.या आधीही राऊतांची पाठ फिरताच 12 माजी नगरसेविकांनी शिंदें गटात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे. 

परभणीत महाविकासआघाडीतील 30 नगरसेवक शिंदे गटात 

तर परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. 

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी, शेतकरी कामगार आशा सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 

नाशिकमधून ठाकरे गटाला मोठमोठे धक्के बसत गेले. यामध्ये दोन आमदार, एक खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील 12 माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी शिंदे गटात गेले. आगामी काळात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकत असल्याने आता त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तातडीने तयारीला लागण्याचे ठरवले आहे. नाशिकमध्ये या संदर्भात रणसिंग फुंकून फुटीरांचा समाचार घेण्यासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच नाशिक मध्ये येणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget