एक्स्प्लोर
Shinde VS Thackeray:नाट्यगृहातला पॉलिटिकल ड्रामा, शिंदेंचे डायलॉग, ठाकरे बंधूंना टोले Special Report
अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिखे नाट्य मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी एकपात्री राजकीय प्रयोग सादर केला आणि विरोधकांवर टोले लगावले. 'शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय' असं थेट वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं. या प्रयोगात त्यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरही भाष्य केलं. दुसरीकडे, संजय राऊत यांनी 'राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद द्या आणि भाऊबंदकी कायमची मिटवा' असा सल्ला दिला. या राजकीय नाट्यगृहाच्या उद्घाटनाने महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टीकेचे फटाके फुटणार असल्याचंही सूचित करण्यात आलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















