एक्स्प्लोर
Advertisement
राजस्थानच्या शिक्षण विभागाचं ‘डोकं ठिकाणावर आहे का?’
‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून ज्यांचं नाव भारतीय स्वातंत्र संग्रामाच्या इतिहासात आदराने घेतलं जातं, त्या टिळकांना राजस्थानच्या शिक्षण विभागाने ‘दहशतवादाचे जनक’ म्हटल्याने सर्वच स्तरातून टीका सुरु झाली आहे.
अजमेर (राजस्थान) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ‘दहशतवादाचे जनक’ आहेत, असे राजस्थानमधील आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकांमध्ये छापण्यात आले आहे. राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाने (आरबीएसई) हा प्रताप केला आहे.
‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हणून ज्यांचं नाव भारतीय स्वातंत्र संग्रामाच्या इतिहासात आदराने घेतलं जातं, त्या लोकमान्य टिळकांना राजस्थानच्या शिक्षण विभागाने ‘दहशतवादाचे जनक’ म्हटल्याने सर्वच स्तरातून टीका सुरु झाली आहे.
राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमिक शाळेने मुथरेतील प्रकाशाकडून हे पुस्तक छापून घेतले आहेत. त्यात पान क्रमांक 267 वरील 22 व्या प्रकरणात "Tilak demonstrated a path towards national movement, therefore, he is called as the father of terrorism" असे म्हटले आहे.
“टिळकांना दहशतवादाचं जनक म्हणणे हे निषेधार्ह आहे. त्याचबरोबर, अशाप्रकारची पुस्तकं छापण्याआधी इतिहासकारांकडून तपासली पाहिजेत.”, असे मत खासगी शिक्षण असोसिएशनचे संचालक कैलाश शर्मा यांनी व्यक्त केले.
A reference book for Class 8 #SocialStudies has described #freedomfighter #BalGangadharTilak as the 'father of terrorism'.
Read @ANI story | https://t.co/GpQh361Tzy pic.twitter.com/YSGsowUFXX — ANI Digital (@ani_digital) May 12, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement