एक्स्प्लोर

सोलापूरकरांना तात्पुरता दिलासा, आज सकाळच्या अहवालात एकाही रुग्णाची वाढ नाही

सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1144 वर पोहोचला आहे. सकाळी रुग्णांची वाढ न झाल्याने तीच आकडेवारी कायम राहिली आहे. समाधानाची बाब म्हणजे 484 रुग्ण योग्य उपचारामुळे बरे होऊन घरी देखील गेले आहेत.

सोलापूर : सोलापुरात मागील काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. मात्र आज, शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात सोलापूर जिल्ह्यास तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल (गुरुवारी) संध्याकाळनंतर आज सकाळपर्यंत सोलापुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत 93 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवारी सायंकाळी 64 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1144 वर पोहोचला होता. आज सकाळी रुग्णाची वाढ न झाल्याने तीच आकडेवारी कायम राहिली आहे. सोलापुरात आज सकाळपर्यंत एकूण 8304 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7162 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आढळले आहेत. तर 1144 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 99 जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे. मृतांमध्ये बहुतांश रुग्ण हे वृद्ध आहेत तर कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी देखील ग्रस्त होते. समाधानाची बाब म्हणजे 484 रुग्ण हे योग्य उपचारामुळे बरे देखील झाले. त्यामुळे उर्वरित 561 रुग्णांवर सोलापुरातील विविध कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना आता होम आयसोलेशन : आयुक्त एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल मात्र कोणतेही लक्षणं नसतील तर अशा रुग्णांना आता घरीच राहून उपचार घेता येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली. मात्र त्याला फारसा त्रास होत नसेल तर घरात राहून उपचार घेता येेणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ज्या घरात अशा पद्धतीने आयसोलेशन झालेल्या व्यक्तीच्या घराबाहेर लाल रंगाचे स्टीकर लावण्यात येईल. रुग्णाला काही त्रास जाणवला तर तात्काळ फोनद्वारे वैद्यकीय तज्ञांना बोलवता येणार आहे. चाचणीनंतर पाच दिवसांनी रुग्णाची पुन्हा तपासणी देखील केली जाणार आहे.  होम आयसोलेशन करण्यात येताना काही नियम आणि अटींची पुर्तता करणे देखील गरजेचे आहे. रुग्णासाठी घरात स्वतंत्र खोली आणि बाथरूम असणे गरजेचे असणार आहे. रुग्णाची देखभाल करण्यासाठी एखादा माणूस असायला हवा. इत्यादी नियमांची पुर्तता झाल्यास या प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देता येणार आहे, असं आयुक्तांनी सांगितलं आहे.  

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget