एक्स्प्लोर
गणपतीसाठी 'तेजस' फुल्ल, कोकणातील चाकरमानी वेटिंगवर
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरु झालेल्या हायटेक तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात चांगलीच मागणी आहे. 25 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी असून, त्यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी तेजस एक्स्प्रेसची तिकिटे 'फुल्ल' झाली आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणातील रहिवाशी मोठ्या संख्येने गावी जातात. त्यामुळे दरवर्षी कोकण आणि मध्य रेल्वेला जादा गाड्या सोडाव्या लागतात. पण यंदा नव्याने सुरु झालेल्या हायटेक तेजस एक्सप्रेसकडे गणेशभक्तांचा ओढा दिसून येत आहे.
गणेशोत्सवानिमित्त 25 रोजीपर्यंतचं बुकिंग फुल्ल झाल्यामुळे त्या दिवशीची प्रतीक्षा यादी 145 पर्यंत गेली आहे. तर दुसरीकडे 21 ऑगस्टची काही तिकिटं अद्याप उपलब्ध असली, तरी येत्या आठ ते दहा दिवसांत ही तिकिटेही संपतील, असा दावा रेल्वेच्या वतीनं केला जात आहे.
दरम्यान, ही गाडी सुरु झाल्यापासून याचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आहे. या गाडीला पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गेल्या 21 मे रोजी रविवारी सकाळच्या सुमारास केवळ सहा तासांत पुढील चार महिन्यांतील हजारो तिकिटांची विक्री झाली होती.
असे आहेत तेजसचे तिकीट दर
संबंधित बातम्या
मार्ग | एसी चेअर (जेवणासह) | एसी चेअर (जेवणाशिवाय) | एक्झिक्युटिव्ह (जेवणासह) | एक्झिक्युटिव्ह (जेवणाशिवाय) |
सीएसटी-रत्नागिरी | 1940 | 1785 | 955 | 835 |
सीएसटी-कुडाळ | 2495 | 2340 | 1200 | 1080 |
सीएसटी- करमाळी | 2740 | 2585 | 1310 | 1185 |
दादर-रत्नागिरी | 1915 | 1760 | 940 | 815 |
दादर-कुडाळ | 2475 | 2320 | 1190 | 1070 |
दादर-करमाळी | 2725 | 2570 | 1295 | 1175 |
ठाणे-रत्नागिरी | 1820 | 1665 | 905 | 780 |
ठाणे-कुडाळ | 2425 | 2270 | 1170 | 1050 |
ठाणे-करमाळी | 2680 | 2575 | 1280 | 1155 |
तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला
अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल
हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा… हायटेक ‘तेजस’ सज्ज!
मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement