एक्स्प्लोर
नर्सरीतल्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, पालकांमध्ये संताप
शहरातील एका खासगी शाळेतील नर्सरीत शिकणाऱ्या चिमुकल्याला महिला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा विद्यार्थी अभ्यासात मागे असल्याचे कारण पुढे करत शिक्षिकेने त्याला जबर मारहाण केली आहे.
![नर्सरीतल्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, पालकांमध्ये संताप teacher beating nursery child, cctv video get viral नर्सरीतल्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद, पालकांमध्ये संताप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/09165547/nashik-cctv-child-marhan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : शहरातील एका खासगी शाळेतील नर्सरीत शिकणाऱ्या चिमुकल्याला महिला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा विद्यार्थी अभ्यासात मागे असल्याचे कारण पुढे करत शिक्षिकेने त्याला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुलांची आकलनशक्ती वाढावी, त्यांना शाळेत जाण्याची गोडी लागावी यासाठी पालक आपल्या पाल्यांना नर्सरीपासून शिक्षण देत असतात. त्याचप्रमाणे या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याच्या पालाकांनीसुद्धा शहरातील एका खासगी शाळेमध्ये त्याला दाखल केले. परंतु त्यांचा मुलगा अभ्यासात मागे असल्याने शिक्षिकेने त्याला अंगावर व्रण उमटेपर्यंत मारहाण केली आहे.
या चिमुरड्याच्या आईने मारहाणीबद्दल शाळेकडे विचारणा केली त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले तेव्हा शाळा व्यवस्थापनाने चूक मान्य करत संबंधित शिक्षिकेला कामावरुन काढून टाकले.
मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ
दरम्यान, चिमुरड्याच्या पालकानी गंगापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संस्थाचालक आणि शिक्षिकेला चौकशीसाठी बोलावून घेतले. शिक्षिकेने घरच्या ताणतणावातून मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली. शिक्षिकेच्या भवितव्याचा विचार करता पालकांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी समज देवून तिला सोडून दिले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)