एक्स्प्लोर

दुधाच्या दराबाबत 4 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा 'शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक' आंदोलन, अजित नवलेंचा सरकारला इशारा

सरकारने दुधाच्या दरासंदर्भात (Milk Price) येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय करावा, अन्यथा महामार्ग रोखत शेतकरी मेगाब्लॉक' आंदोलन सुरु करतील असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी दिला.

Milk Price News : सरकारने दुधाच्या दरासंदर्भात (Milk Price) येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय करावा, अन्यथा महामार्ग रोखत शेतकरी 'शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक' आंदोलन सुरु करतील असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिला. दूध हमीभावाबद्दल ठोस आश्वासन नसल्याने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाला प्रति लिटर 40 रुपये हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा आज 40 वा दिवस आहे. कोतुळ येथे सुरु असलेल्या धरणे आंदोलनाचा आज 26 वा दिवस आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे दुग्धविकास आयुक्त मोहोड साहेब यांनी संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी 26 जुलै 2024 रोजी तीन तास चर्चा केली. चर्चेच्या पार्श्वभूमीवर मान्य करण्यात आलेल्या मागण्यांची चर्चा दुग्धविकास मंत्री यांच्याबरोबर करून आंदोलकांना मान्य करण्यात आलेल्या मागण्यांचे मिनिट्स काल हस्तांतरित करण्यात आले. मिनिट्स मध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांची कोतुळ येथील मंडपात आंदोलकांनी जाहीर चर्चा करून याबाबत विचारविनिमय केला. सरकारच्या वतीने मान्य करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये काही सकारात्मकता असली तरी दुधाला दीर्घकाळ 40 रुपये दर कसा देता येईल याबाबत पुरेशी स्पष्टता दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनुदान दिले जाईल. तोवर  दर पडणार नाहीत याची काळजीही घेतली जाईल, मात्र निवडणूक झाल्यानंतर काय पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होणार का ? या वास्तववादी शंकेने शेतकऱ्यांना अस्वस्थ केल्याचे नवले म्हणाले. 

अनुदानाची नाटके दोन-तीन महिने चालतात, पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं

मागील अनुभव पाहता अनुदानाची नाटके दोन-तीन महिने चालतात आणि पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. यावेळीही पुन्हा तसेच होईल अशी रास्त भीती शेतकरी व आंदोलकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे दीर्घकाळ उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याबद्दल जोवर धोरण घेतले जात नाही, तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व कोतुळ आंदोलकांनी केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनुदान वाटपातही अनेक गोंधळ अद्याप कायम आहेत. वर्षाच्या सुरुवातीला दोन महिने दिले गेलेल्या अनुदानात अनेक शेतकरी वंचित आहेतच, मात्र नंतर जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाबाबतही अनेक गंभीर शंका आहेत. 1 जुलै ते 10 जुलै या काळातील अनुदान अनेक संस्थांनी दिलेले नाही. अनेक खासगी संस्थांनी तर अद्याप दोन दसवडे पूर्ण होऊनही याबाबत 27 रुपयांचा दर देणे सुरू ठेवले आहे.

 पशुखाद्यांच्या दराला लगाम लावण्याबद्दल कोणताही ठोस पर्याय नाही

3.2/8.3 गुण प्रतीच्या आतील दुधाला अनुदान नाकारण्यात आले असून, शेतकऱ्यांची अधिक कोंडी करण्याच्या दृष्टिकोनातून फॅट/ एस.एन.एफ डिडक्शन अशा दुधासाठी 30 पैसे ऐवजी 1 रुपया करून शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा सुद्धा कमी दर मिळतील अशी व्यवस्था काही दूध संघ व काही दूध कंपन्यांच्या वतीने करण्यात आली आहे.  प्राथमिक संस्था व बल्क कुलर चालक यांचा दूध हाताळणी कमिशन खर्च चार रुपयावरून दीड रुपयापर्यंत पाडण्यात आला आहे व त्यांचीही कोंडी करण्यात आली आहे. पशुखाद्य कंपन्या पशुखाद्याचे दर सातत्याने वाढवत आहेत. पशुखाद्यांच्या दराला लगाम लावण्याबद्दल कोणताही ठोस पर्याय सरकारने समोर ठेवलेला नसल्याचे नवले म्हणाले.

सर्व प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी

सरकार सर्व प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेता येणार नाही असा ठाम विश्वास आंदोलकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सरकारने या सर्व प्रश्नांच्याबाबत येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय करावा अन्यथा महामार्ग रोखत शेतकरी 'शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक' आंदोलन सुरू करतील असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दिला आहे. यावेळी सदाशिव साबळे, विनोद देशमुख, नामदेव साबळे, अभिजीत उर्फ बबलू देशमुख,  भाऊसाहेब देशमुख, प्रकाश देशमुख, अभि देशमुख, वैभव देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

मान्य मागण्यांचे लेखी आश्वासन द्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, दुग्ध आयुक्तांसोबतच्या बैठकीत काय घडलं? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Jain Boarding Case: पुणे जैन बोर्डिंग वाद प्रकरणी सुनावणी 30 तारखेला
Maharashtra Politics 'भाजप देशात अनेक ठिकाणी कुबड्यांवर, महाराष्ट्रात 2,शहांना राऊतांचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे भस्म्या रोग झालेला Anaconda, एकनाथ शिंदेंच प्रत्युत्तर
Cartoon War'मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता',Navnath Ban यांचे Ravindra Dhangekarयांना प्रत्युत्तर
Farmer Aid Row: 'शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही', मंत्री Makarand Patil यांचा दावा; प्रशासनासोबत खडाजंगी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
The Family Man 3rd Season: ‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
Prakash Mahajan : खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
Embed widget