एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेतकरी नेत्यांची जोडी फुटली, सदाभाऊंची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सदाभाऊंविरोधातील तक्रारींबाबत स्वाभिमानीने पक्षांतर्गत चार सदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी याबाबत पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा केली.
"सदाभाऊ यांच्या पक्षनिष्ठेवर शंका उपस्थित झाली आहे. शिवाय, त्यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे.", असे दशरथ सावंत म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळातील सदाभाऊंची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मंत्रिपद सोडून जागा रिकामी करावी, असे आवाहन दशरथ सावंत यांनी केले आहे.
सदाभाऊंची आतापर्यंतची वाटचाल :
- 1990 पासून शेतकरी संघटनेत सक्रीय
- 2004 नंतर राजू शेट्टींसोबत कार्यरत
- 2009 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सामील
- 2014 साली माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली. विजयसिंह मोहिते-पाटलांनी कडवी झुंद देत सुमारे 25 हजार मतांनी पराभव
- जून 2016 भाजपतर्फे विधानपरिषदेवर
- जुलैमध्ये राज्य मंत्रिमंडळात कृषी, पणन राज्यमंत्री
- राजू शेट्टी आणि सदाभाऊंमध्ये मतभेदाला सुरुवात
- संघटनेपासून दूर गेल्याचा आरोप
- तूर आंदोलन, आत्मक्लेश यात्रेत सहभाग नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement