एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर शिस्तपालन समितीसमोर हजर झालेच नाहीत, 15 ऑगस्टपर्यंत दिलेला अल्टीमेटम संपला 

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकरांना आपले म्हणणे मांडण्यासाठीचा 15 ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम दिला होता. मात्र, ते हजर राहिले नाहीत.

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Saghtana) फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानीचे युवा नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी संघटनेच्या नेतृत्वाबद्दल काही आक्षेप नोंदवले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन  समितीने रविकांत तुपकरांना आपले म्हणणे मांडण्यासाठीचा 15 ऑगस्टपर्यंत दिलेला अल्टीमेटम संपला आहे. त्यामुळं रविकांत तुपकर यांच्याबाबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

रविकांत तुपकर हे गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या कार्यपाध्दतीवर नाराज आहेत. त्यांनी गेल्या काही काळात राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका देखील केलीय. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. त्यामुळं आता रविकांत तुपकर यांच्या मनात चाललंय तरी काय...? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान, तुपकरांनी आपली भूमिका माध्यमांसमोर न मांडता त्यांनी शिस्तपालन समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. याबाबत पुण्यात आका बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र, रविकांत तुपकर त्या बैठकीला हजर राहिले नव्हते. या बैठकीत तुपकरांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. 

तुपकरांचे राजू शेट्टींना पत्र

दरम्यान, रविकांत तुपकर हे 15 ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर हजर झालेच नाही.
रविकांत तुपकरांनी आपले राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धती आणि भूमिकांबद्दल असणारे आक्षेप लेखी पत्राद्वारे राजू शेट्टी आणि समितीला पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
10 पानांचे भले मोठे पत्र तुपकरांनी राजू शेट्टींना पाठवल्याचे समजते. त्यामुळं आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्तपालन समिती पुढे काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रविकांत तुपकरांचं नेमकं म्हणणं काय ? 

मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी मांडली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही तुपकर यावेळी म्हणाले. 

महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार

मला शेतकरी संघटनेच राहूनच काम करायचे आहे. शेतकरी हा माझा आत्मा असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मला शेतकऱ्यांसाठी लढत राहायचंय. यासाठी मी आजपासून कामाला लागलो असल्याची तुपकर म्हणाले. गेल्या चार ते पाच वर्षात अनेकवेळा राजू शेट्टी यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली असल्याचे तुपकर म्हणाले. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. संघटनेत राहूनच चळवळीचं काम करत राहणार आहे. ते मला नेतृत्वानं प्रामाणिकपणानं करु द्यावं अशी माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले. शेतकरी प्रश्नांवर लढण्यासाठी महाराष्ट्रात तरुण पोरांची मोठी फौज उभारणार असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.   

महत्त्वाच्या बातम्या:

Ravikant Tupkar : भाजपच्या कोणत्याही नेत्याचा मला फोन नाही, आशिष देशमुखांच्या वक्तव्यानंतर रविकांत तुपकरांचं प्रत्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget