एक्स्प्लोर

सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी आठ दिवसात दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंगास परवानगी ; नीलम गोऱ्हेंचा निर्वाणीचा इशारा

सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल, असे निलम गोऱ्हे म्हणाले. 

नागपूर उपसभापती रविंद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar)   सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी प्रसिद्ध केला होता. मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळं तात्काळ सुषमा अंधारे यांच्यवर हक्कभंग आणावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केले आहे. त्यानंतर सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाले. 

रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत तर मग विधानपरिषदेच्या उपसभापती  नीलम गोऱ्हे त्यांना बोलू कशा देत नाहीत? असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर सुषमा अंधारेच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,  धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन.  

नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. दरम्यान यावरूनच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचे मत मांडले. तसेच, माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. विशेष म्हणजे यावर अनेक आमदारांनी देखील आपली भूमिका सभागृहात मांडली. 

सभागृहात कोण काय म्हणाले?

शशिकांत शिंदे:  सभागृहाबाहेर बोलल्याचा संबंध सभागृहाशी नाही.अशा प्रकारे हक्कभंग मांडणे, हा नियम बनू शकतो

सुधीर मुनगंटीवार: याविषयी काही नियम बनविण्याची गरज आहे.याकरता समिती बनविण्याची गरज आहे

सचिन अहिर:  मी मान्य करतो की त्यांचे बोलणे चुकीचे आहे. 

 

 

हे ही वाचा :

Sushma Andhare : ललित पाटील प्रकरणी देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत आहेत, नीलम गोऱ्हे पक्षपातीपणा करतात; सुषमा अंधारे यांची टीका 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget