एक्स्प्लोर

Sushma andhare Shivsena Dasara Melava 2023 : फडणवीस तुम्ही महाराष्ट्र नासवलाय, लेकी बाळांना घाबरवत आहात; सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल!

Sushma andhare Shivsena Dasara Melava 2023 : फडणवीस तुम्ही फेल ठरले आहात, सरळ सरळ प्रश्नांची उत्तरे द्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कडाडून हल्ला चढवला. 

Shivsena Dasara Melava 2023 : सुषमा अंधारे चळवळीतून आली आहे, बाळासाहेबांचं बाळकडू आहे, आमदार, कोट्यधीशांना तुम्ही नडला असाल पण मध्यमवर्गीयांना कधी नडला नसाल, ड्रग्जमुक्त महाराष्ट्राचा लढा देते आहे, फडणवीस तुम्ही फेल ठरले आहात, सरळ सरळ प्रश्नांची उत्तरे द्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कडाडून हल्ला चढवला. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, दहा दिवसांपासून मला नोटीस पाठवणारे मला अंधारात सेटलमेंटची भाषा करत आहेत. नाशिकचा अमोल परदेशी पुण्याच्या एकीला फोन करतो. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू? हे धमकावत राहतात आणि फडणवीस म्हणतात सर्वांचे आवाज बंद होतील. गृहमंत्री साहेब ललित पाटील आमचा होता अशी बदमाशी का करता? शिवतीर्थावरून विचारते  की 9 महिने त्याला कोणता आजार होता की त्यामुळे ससूनला ठेवले? गरोदर महिला सोडून कोणालाच एवढे दिवस ठेवत नाहीत. त्याच्यासह इतर तिथं काय करत होते?

फडणवीस तुम्ही महाराष्ट्र नासवलाय, लेकी बाळांना घाबरावत 

त्या पुढे म्हणाल्या की,  पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवा तरुणांना वाचवा. मला घाबरायला फडणवीस काही लोकांना पुढे करतात, मला तर ते चाणक्य अजिबात वाटत नाही.  पवार साहेबांनी कोणाला घडवलं तर अजित दादा आणि इतरांना. देवेंद्रजी तुम्ही कोणाला घडवलं? तर तुम्ही फक्त जमवलं. चंद्रकांत पाटलांना संपवायच्या तुम्ही मागे लागला आहात. देवा भाऊ सगळं तुमच्याकडे असतांना शिवसेना, राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करता?फडणवीस तुम्ही महाराष्ट्र नासवलाय, लेकी बाळांना घाबरावतायत. 

नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का?  

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांच्यावर कडाडून प्रहार केला. नाशिकमध्ये ललित पाटील ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी चौफेर हल्ला चढवला आहे. दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी दादा भुसे आणि एक्साईज मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून प्रहार केला. नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? अशा शब्दात त्यांनी दादा भुसेंवर प्रहार केला. महाराष्ट्र ड्रजमुक्त झाला पाहिजे, महाराष्ट्र नशामुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget