(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare : राणेंवर गुन्हे दाखल झाले नाही तर याचा अर्थ तिन्ही कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार फडणवीसांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे; सुषमा अंधारेंचा आरोप
नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले. यावेळी चार आणे, बाराणे, अटक करा नारायण राणे अशा घोषणा सुषमा अंधारे यांनी दिल्या.
Sushma Andhare on Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काल (28 ऑगस्ट) सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्याला भेट दिली. आदित्य ठाकरे राजकोटवर आले असतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणेही त्यांच्या समर्थकांसह गडावर पोहोचले. यावेळी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे हेही त्यांच्यासोबत होते. आदित्य ठाकरे यांना प्रवेश देण्यावरून नारायण राणे आणि निलेश राणे यांनी पोलिसांशी वाद घातला.
निलेश राणे पोलिसांना धमकी देत असल्याचे तसेच खासदार असूनही नारायण राणे एकेकाला मारून टाकेन अशी जाहीर धमकी देताना दिसून आले. या सर्व पार्श्वभूमीवर नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केले. यावेळी चार आणे, बाराणे, अटक करा नारायण राणे अशा घोषणा सुद्धा सुषमा अंधारे यांनी दिल्या. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पुण्यातील आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.
पत्रकार सामान्य नागरिक पोलीस यांच्याशी सतत दमदाटीची भाषा, गुंडागर्दी, सामाजिक प्रदूषण पसरवणाऱ्या राणेंवर गुन्हे दाखल झाले नाही तर याचा अर्थ या तीनही कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार @Dev_Fadnavis यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे. @ShivSenaUBT_ https://t.co/YiT2LMuzNI
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 29, 2024
तर फडणवीसांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे
सुषमा अंधारे यांनी पुण्यातील आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, पत्रकार सामान्य नागरिक पोलीस यांच्याशी सतत दमदाटीची भाषा, गुंडागर्दी, सामाजिक प्रदूषण पसरवणाऱ्या राणेंवर गुन्हे दाखल झाले नाही तर याचा अर्थ या तीनही कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करायचा आहे.
सुषमा अंधारेंनी इतिहासाची तीन पानं वाचून दाखवली!
पुण्यातील आंदोलनातून सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्मपासूनचा आम्हाला माहीत आहे. 1990 मध्ये कणकवली कधीकाळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा केलात. 1990 मध्ये श्रीधर नाईकांची हत्या झाली त्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होता. तुमच्यावर खटला चालवला गेला. तुमचा इतिहास इतका मोठा आहे की, 2002 मध्ये सत्यजित भिसेची कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोलले होते आणि न्यायालयात खटला चालला.
2009 ला राणेजी तुमचा सख्खा चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह सिंधुदुर्गमध्ये अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता, हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की, मुलुंडचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याने अविघ्न पार्क मधील जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली.
इतर महत्वाच्या बातम्या