Supriya Sule on Baramati Loksabha : तरी माझी काहीच हरकत नाही! सुप्रिया सुळेंकडून मोजक्याच शब्दात बारामतीच्या 'भावनिक' लढाईवर उत्तर
लोकशाही मत मांडण्याचा अधिकार असून विरोधक दिलदार असला पाहिजे. वैचारिक लढाई असल्यास घरातील व्यक्ती माझ्याविरुद्ध लढली तरी काय हरकत नाही, अस होतं असल्याचे त्या म्हणाल्या.
पुणे : घराणेशाही भाजपमध्ये झाली तर टॅलेंट, आमच्याकडे झाली तर घराणेशाही असल्याचा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. तुमच्याकडे 200 आमदार आणि 300 खासदार आहेत, मग त्यांच्याकडे लॅक ऑफ टॅलेंट आहे का? एवढे लोक आहेत, तर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी निघा, अशा शब्दात सुप्रिया सुळे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा समाचार घेतला. अमित शाह यांना मी प्रांजळप्रणे सांगते की, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मी तिकीट मागितलं आहे, नेहमीच असेही त्या म्हणाल्या.
घरातील व्यक्ती माझ्याविरुद्ध लढली तर काय हरकत नाही
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझं काम बघा, माझ्यावर भ्रष्टाचार कधीच आरोप झाला नाही. मी मुख्यमंत्री होण्याचा विषय येतो कुठे? मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामती लोकसभा तिकीट मागितले आहे. लोकशाही मत मांडण्याचा अधिकार असून विरोधक दिलदार असला पाहिजे. वैचारिक लढाई असल्यास घरातील व्यक्ती माझ्याविरुद्ध लढली तरी काय हरकत नाही, अस होतं असल्याचे त्या म्हणाल्या.
अजित पवार यांनी सेल्फीवरून केलेल्या टीकेवरून सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, सगळे आई वडील म्हणतात की मुलांना सांगितलं आहे फॉर्म भरून सेल्फी काढून पाठवायला. रेल्वे स्टेशन, शाळा, सगळीकडे. प्रधानमंत्री सांगतात सेल्फी काढा. एखादा सेल्फी काढून व्यक्ती खुश होते, तो आनंद वेगळाच असतो, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
नविन पक्ष चिन्ह हा अधिकार पण काढून घेणार तुम्ही?
संसद रत्न पुरस्कार प्रक्रिया काय असते, सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रपतींनी आमचं कौतुक केलं. या देशात सगळ्यात उच्च राष्ट्रपती आहेत, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे आमच्यावर संस्कार असल्याचे त्या म्हणाल्या.
पक्ष आणि चिन्हावरून सुरु असलेल्या लढाईवरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. आम्ही फक्त न्याय मागत आहोत. त्यांनी मेरिट प्रमाणे करायला हवं. शरद पवार यांचं निवडणूक चॅलेंज करता मग अजित पवारांचं करा, कुणाकडे किती आमदार हा विषय येत नाही. शरद पवार अजित पवार यांना वेगवेगळे न्याय कशासाठी? शरद पवार स्वतःच्या कर्तृत्वाने उभे असून दुसऱ्यांमागे अदृश्य शक्ती आहे.
सुप्रीम कोर्ट म्हणाले, पाकिस्तानमध्ये काय चाललंय बघा, तसे आपल्याकडे होता कामा नये. राजकारण आमच्यासाठी वैचारिक लढाई आहे. आम्ही निष्ठेने सेवा केली ही आमची चूक झाली का? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या