एक्स्प्लोर
"सगळीच रसायनं चांगली नसतात", सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील पडझड सुरुच आहे. अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नाशिक : "सगळीचं रसायनं चांगली नसतात," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील पडझड सुरुच आहे. अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरुन भाजपकडे वॉशिंग पावडर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गेले की नेते स्वच्छ होतात," अशी टीका सुप्रिया सुळेंनी टीका केली होती. मात्र भाजपकडे वॉशिंग पावडर नाही तर डॅशिंग केमिकल आहे, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे
रसायचा विकास हवाय की आम्ही केलेला?
याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी परवा मुख्यमंत्र्यांना विचारलं, तुम्ही आमच्यावर आरोप करता, पण तोच माणूस तुमच्याकडे आला तर साफसुथरा आणि चांगला होतो. अशी कसली वॉशिंग पावडर तुमच्याकडे आहे की, धुवून माणूस साफ होतो. त्याचं उत्तर त्यांनी काल दिल. ते म्हणाले सुप्रिया सुळे, आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही, आमच्याकडे डॅशिंग रसायन आहे. मी सायन्स स्टुंडट आहे. सगळीच रसायनं चांगली नसतात. आजकाल शेतकरी पण रसायनं नको, कीटकनाशकं नको म्हणतात. महिला रसायनं असलेल्या भाज्या नको म्हणतात. त्यामुळे तुम्हाला यांच्या रसायनाचा विकास हवाय की आम्ही केलेला विकास पाहिजे, याचा विचार करायची वेळ आली आहे."
जाणाऱ्यांनो सांभाळून राहा!
जगात रसायनं बॅन होत आहेत. त्यामुळे जाणाऱ्यांनो तुम्ही पण सांभाळून राहा. ते रसायनांची पावडर तुमच्यावर टाकत आहेत. त्यामुळे रसायनातून काय होतं हे तुम्ही पाहिलं आहे. रसायनापासून सांभाळून राहायला पाहिजे, मी तर राहते, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना दिला.
मुख्यमंत्र्यांना बेरोजगारांचा बायोडेटा पाठवणार
नाशिकमधील बॉश कंपनीतील उत्पादन बंद असल्याने हजारो कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागलं. तर नोकऱ्यांच्याबाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी धुळ्यात केला होता. यावर निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री सांगतात आमच्याकडे इतक्या नोकऱ्या आहेत की आम्ही देशात तीन नंबरवर आहोत. देशात मंदी आहे, त्यामुळे ते मंदीमध्ये तीन नंबर म्हणाले की नोकरीत हे मला कळलं नाही. पण नाशिककरांनो चिंता करु नको. ज्यांच्या-ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यांनी आपापले बायोडेटा गोळा करा, मला द्या, मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील 20-30 हजार बायोडेटा मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे, कारण त्यांच्याकडे नोकऱ्या आहेत. तुमचं चांगलं काम आहे तर तुम्ही नोकऱ्या द्या. तुम्ही नोकऱ्या देताय तर आनंद आहे. माझ्या राज्याचं भलं होत असेल तर मी जाहीरपणे आभार मानेन."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement