कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊले उचलावी लागतील : केडीएमसी आयुक्त
कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रोजच्या आकड्यांनी गेल्या 3 आठवड्यात 80 वरून आता सुमारे पावणे तीनशेचा आकडा गाठला असून गेल्या आठ दिवसात 1705 रुग्णांची भर पडली आहे . या पार्श्वभूमीवर टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याबरोबरच ज्या बिल्डींगमध्ये कोवीड रुग्ण आढळून येतील. त्या बिल्डिंगमधील सर्व नागिरकांचे टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

मुंबई : कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन आणखीनच सतर्क झालं आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रोजच्या आकड्यांनी गेल्या 3 आठवड्यात 80 वरून आता सुमारे पावणे तीनशेचा आकडा गाठला असून गेल्या आठ दिवसात 1705 रुग्णांची भर पडली आहे . या पार्श्वभूमीवर टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याबरोबरच ज्या बिल्डींगमध्ये कोवीड रुग्ण आढळून येतील. त्या बिल्डिंगमधील सर्व नागिरकांचे टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
काही ठिकाणी टेस्टिंगला विरोध होत असल्याने नागरिकांनी टेस्टिंगसाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. येत्या काळात कठोर पाऊले उचलावे लागतील असा इशारा पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये स्ट्रिक्ट अॅक्शन घ्यावे लागतील. सध्या ज्या कोवीड केसेस वाढत आहेत त्या लग्नसमारंभ आणि सोहळ्यामधील केसेस वाढत असून यावर आता अत्यंत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
येत्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी न झाल्यास कठोर निर्णय घेण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.
आठ दिवसांची आकडेवारी
1 मार्च - 173 रुग्ण
2 मार्च - 158 रुग्ण
3 मार्च -241 रुग्ण
4 मार्च - 244 रुग्ण
5 मार्च - 210 रुग्ण
6 मार्च -210 रुग्ण
7 मार्च - 271 रुग्ण
8 मार्च -198 रुग्ण
कल्याण डोंबिवलीत एकूण रुग्ण -64,823
उपचार घेत असलेले रुग्ण -2,103
कोरोनावर मात केले रुग्ण संख्या - 61,544
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 1, 176
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाखावर
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 28 हजार 471 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 20 लाख 77 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण 97 हजार 637 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या 4 लाख 41 हजार 702 जण होम क्वॉरन्टीन असून 4 हजार 098 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीन आहेत.
केंद्रीय पथकाचा अहवाल
कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने स्पष्ट केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात म्हटलं आहे. आरोग्य यंत्रणा देखील आता खूप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने 1 आणि 2 मार्च रोजी हा कोरोना पाहणी दौरा केला.
























