एक्स्प्लोर

इलेक्टोरल बॉण्डचा पुरवठा सुरूच! नाशिक प्रेसकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली

India Security Press Nashik : नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेसकडून अजूनही कोट्यावधींचा निवडणूक रोख्यांचा पुरवठा सुरूच असल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून उघडकीस आली आहे. 

Electoral Bonds : निवडणूक रोख्यांसंदर्भात (Electoral Bonds) स्टेट बँकेला (SBI) सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला होता. या दणक्यामुळे सत्ताधाऱ्यांची आर्थिक नाकेबंदी झाल्याचे दिसून आले. परंतु, नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेसकडून (India Security Press Nashik) अजूनही कोट्यावधींचा निवडणूक रोख्यांचा पुरवठा सुरूच असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

कमांडर लोकेश बात्रा (सेवानिवृत्त) यांनी माहिती अधिकार अधिनियमान्वये माहिती मागवली होती. या आरटीआयमधून ही माहिती उघडकीस आली आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांबाबत निर्णय देताना निवडणूक रोखे (Electoral Bonds) हे असंविधानिक असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने निवडणूक रोखे जारी करण्याला स्थगिती देण्यात आली होती. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली

नाशिकमधील सिक्युरिटी प्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर 21 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 1 कोटी रुपये किमतीचे 8 हजार 350 निवडणूक रोखे छापून पुरवठा केला आहे. या निवडणूक रोख्यांवर 3 लाख 72 हजार 224 रुपयांचा जीएसटी लावण्यात आला आहे. यावरून नाशिक प्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. 

नेमकी काय होती निवडणूक रोखे योजना? 

मोदी सरकारने एका विधेयकाद्वारे राजकीय पक्षांना देण्यात येत असलेल्या देणग्यांमध्ये स्पष्टता यावी यासाठी निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली होती. ही योजना मार्च 2018 मध्ये कार्यान्वित करण्यात आली होती. राजकीय पक्षांना देणगीदाराचे नाव गुप्त ठेऊन मदत करण्याची सोय या योजनेतून करण्यात आली होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत शाखांमधून निवडणूक रोखे  खरेदी करून आपल्याला हव्या त्या राजकीय पक्षांना देता येणे शक्य होते. निवडणूक रोख्यांची किंमत 1 हजार, 10 हजार, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी इतकी होती. निवडणूक रोखे ज्या पक्षाला देण्यात येतील त्यानंतर संबंधित पक्षाने 15 दिवसात ते रोखे बँकेत वटवावे, अशी मुभा या योजनेतून देण्यात आली होती.  

कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले? 

  • भाजपा : 6 हजार 986.5 कोटी
  • तृणमूल काँग्रेस : 1387 कोटी
  • काँग्रेस : 1334.35 कोटी
  • डीएमके : 656.5 कोटी
  • बिजू जनता दल : 944.5 कोटी
  • वायएसआर काँग्रेस : 442.2 कोटी
  • तेलगू देसम : 181.35 कोटी
  • बीआरएस : 1322 कोटी
  • सपा : 14.05 कोटी
  • अकाली दल : 7.26 कोटी
  • AIADMK : 6.05
  • नॅशनल कॉन्फरन्स : 50 लाख 

इतर महत्वाच्या बातम्या

Bhavana Gawali: फडणवीसांच्या घरात जाताना उत्साहात, पण भेटीनंतर भावना गवळींचा नूरच बदलला, यवतमाळमधून पत्ता कट?

Jalgaon Loksabha : जळगावात ठाकरे गटाची मोठी खेळी, स्मिता वाघ यांच्याविरोधात भाजपच्याच नेत्याला रिंगणात उतरवणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget