एक्स्प्लोर
शिर्डीमध्ये मायलेकीचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न
शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये मायलेकीनं रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात सुदैवानं मुलगी बचावली, मात्र आईला आपला जीव गमावावा लागला आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमीयामध्ये ही घटना घडली आहे.
टाकळीमीयाजवळ लता रविंद्र चोथे या महिलेनं आपल्या 18 वर्षीय मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. मनमाड-दौंड मार्गावर धावणाऱ्या साई एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात लता चोथे यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सोनालीवर नगरच्या विखे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement