Sudhir Phadke : सुधीर फडकेंना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्यावा, महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाची सरकारकडे मागणी
दिवंगत संगीतकार आणि गायक सुधीर फडके (Sudhir Phadke) यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुसस्कार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळानं भारत सरकारकडे केली आहे.
Sudhir Phadke : दिवंगत संगीतकार आणि गायक सुधीर फडके (Sudhir Phadke) यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुसस्कार द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळानं भारत सरकारकडे केली आहे. काल (1 नोव्हेंबर) महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत सुधीर फडके यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी भारत सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. सुधीर फडके यांनी जवळपास १ हजार 300 हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. त्यामुळं मरणोत्तर त्यांनी भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सुधीर फडके यांनी देशाचं संगीतास वैभव मिळवून दिले
सुधीर फडके अर्थात बाबूजी यांनी देशातील 14 भाषांमध्ये संगीत रामायण भाषांतरित करुन लोकांना दिले आहे. तसेच त्यांनी जवळपास 1 हजार 300 हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. अशा महाराष्ट्र भूषण बाबूजींना 74 मोठे पुरस्कार विविध क्षेत्रातून मिळाले आहेत. महाराष्ट्राचं भूषण असलेल्या गायक संगीतकार सुधीर फडकरेंना बाबूंना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात याव अशी मागणी महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ खंडारे यांनी केली आहे. सुधीर फडके यांनी 14 भाषेत संगीत रामायण देऊन देशातील सर्व लोकांना एकवले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं. तसेच संगीत आणि संगीतरचना सुधीर फडके यांनी दिली. त्यांनी या देशाचं संगीत वैभावास नेले आहे. त्यामुळं भारत सरकारला मी विनंती करतो की, त्यांनी सुधीर फडके यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा असे मत जेष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ खंडारे यांनी व्यक्त केले.
द्वारका पीठाचे श्री शंकराचार्य यांनी सुधीर फडकेंचा 'स्वरश्री' या पदवीनं गौरव केला होता
द्वारका पीठाचे श्री शंकराचार्य यांनी संगीतमय गीतरामायण एकूण सुधीर फडकेंचा 'स्वरश्री' या पदवीनं गौरव केला होता. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम या गीताची आव्हानात्मक व मातृभूमीविषयक सौहार्द भावांची पेरणी त्यांनी केली. 1 हजार 300 मराठी तसेच हिंदी चित्रपटांना संगीत देण्याचं मोठं काम सुधीर फडके यांनी केलं आहे. सुधीर फडके हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारताचे आकर्षक व्यक्तिमत्व होते असे मत जेष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ खंडारे यांनी व्यक्त केले. त्यांनी फुलवलेल्या संगिताचे स्वरनंदनवन रसिकांच्या मनावर सखोल व मोहिनीस्वरुप प्रभावीत करायचे. भारतीय संगिताचे सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी त्यांनी कितीतरी आपत्तींना तोंड दिले आहे. त्यामुळं त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी खंडारे यांनी केली आहे.