एक्स्प्लोर
नाशकात शिवसेना नगरसेवक बडगुजर यांना अटक

नाशिक: भाजप महिला मेळाव्यातील राड्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना अटक झाली आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या अटकेनंतर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या अटकेला विरोध दर्शवत घोषणाबाजी सुरु केली आहे. तसंच या अटकेनंतर शिवसेना कार्यालयात उत्तर महाराष्ट्र नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी उपस्थित आहेत. काय आहे प्रकरण? नाशिकमध्ये 22 मार्चला भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात भाजपच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीचं समर्थन केल्याचा दावा शिवसेनेचा होता. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी गोंधळ घातला. स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर श्रीकृष्ण लॉन्सवर असलेल्या भाजपच्या महिला मेळाव्यात धुडगूस घालत तोडफोड केली. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेक करून हाणामारी झाली. शिवसैनिकांनी महिला मेळावा उधळल्यानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. नाशिक-पुणे हायवेवर भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरु केला आहे. शिवसैनिकांवर गुन्हा दरम्यान या प्रकारानंतर भाजप महिला नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात दरोड्यासारख्या गंभीर आरोपांचाही समावेश आहे.
संबंधित बातमी
भाजप महिला मेळाव्यात राडा, शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा
नाशिकमध्ये स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली!
आणखी वाचा























