MPSC: पीएसआय परीक्षेसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मर्यादा वाढली, गेल्या वर्षीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार
पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीसाठी 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावं, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती.
Police Recruitment: महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी 2021 आणि 2022 या वर्षात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीसाठी 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर आता 2021-2022 मध्ये काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरल जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2020 या वर्षांमध्ये शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये 2020-21 या वर्षांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोना असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर हे प्रमाणपत्र काढता आलं नव्हतं. त्यामुळे 2021आणि 2022 या वर्षात काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याची मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC News) तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.
विविध मंत्रालय प्रशासकीय विभागात भरती करण्यात येणार
सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर ग्रह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार 600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल. वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल.. यांचा पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल. वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल.