एक्स्प्लोर
Advertisement

शिक्षकाची बदली, विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर
सध्या शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना आपण पाहतो. पण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक दुर्मिळ घडली आहे. चक्क शिक्षकाला निरोप देताना संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले.

इगतपुरी : सध्या शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना आपण पाहतो. पण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक दुर्मिळ घडली आहे. चक्क शिक्षकाला निरोप देताना संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले. नाशिकच्या ईगतपुरी तालुक्यातील ही घटना आहे.
पांगुळ गव्हाण गावात वैभव गगे नावाच्या शिक्षकाची बदली झाली. काल शनिवारी शाळेच्या आवारातच त्यांचा निरोप समारंभ सोहळा पार पड़ला. या निमित्ताने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयाजीत केला होता. या कार्यक्रमात संपूर्ण गाव तेथे जमा झाले. निरोप समारंभाला गोळा झालेल्या लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धाना अश्रू अनावर झाले. गगे गुरुजींनी गावातील ज्येष्ठ मंडळीचे पाया पड़त आशीर्वाद घेतले तर विद्यार्थ्यानी शाळेची प्रार्थना म्हणत रडत रडत त्यांना निरोप दिला.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील वैभव गगे हे शिक्षक मूळचे शहापुर तालुक्यातील आहेत. वैभव गगे 21 जून 2007 साली या शाळेत रुजू झाले होते. पहिले ते पाचवी इयत्तेच्या मुलांचे ते वर्गशिक्षक होते. खेड़ेगावातील मुलांना संगणक़ाचे ज्ञान देत. तसेच डिजीटलायझेशनमध्येही त्यांचा खुप मोलाचा वाटा आहे. गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात ते सहभागी होत असतं. या शिक्षकाची 15 जून रोजी बदली होणार हे कळताच संपूर्ण गाव भावूक झाले.पांगुळ गव्हाण तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इथल्या शिक्षकाचा बदली झाल्यानंतरचा निरोप सोहळा. pic.twitter.com/VVAdVIu5ZS
— Rahul Kulkarni (@RahulAsks) June 23, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
