एक्स्प्लोर
Advertisement
परभणीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, तलवारीने वार
शिवसेनेचे खासदार बंडू जाधव आणि त्यांच्या इतर 6 सहकाऱ्यांनी एकाला तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची (307) तक्रार एका गटाने केली आहे.
परभणी : डीजे लावण्याच्या कारणावरून काल रात्री (रविवार) परभणीत दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार बंडू जाधव आणि त्यांच्या इतर 6 सहकाऱ्यांनी एकाला तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची (307) तक्रार एका गटाने केली आहे.
नानलपेठ पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली असून खासदार बंडू जाधव यांच्या गटाकडून अट्रोसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. खासदारांनी आपल्याला तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करणारे वसंत मुरकुटे यांनी भाजपकडून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. जुन्याच वादातून शिवसेनेचे खासदार बंडू जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गालावर तलवारीने वार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
थर्टी फर्स्ट निमित्त काल काद्राबाद प्लॉट येथे राठोड नामक व्यक्तीच्या घरातून डीजे लावण्यासाठी लाईटचं कनेक्शन घेतलं जात होतं. वसंत मुरकुटे राठोड यांच्या घराबाहेर थांबले होते. शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांचे सहकारी कांबळे आणि वसंत मुरकुटे यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं.
या हाणामारीनंतर खासदार बंडू जाधव हे घटनास्थळी आले. त्यावेळी खासदार समर्थकांनी मुरकुटे यांना पकडून उभा केलं, तर स्वतः खासदार बंडू जाधव यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीचा डोक्यावर वार केला. पण वसंत मुरकुटेंनी हालचाल केल्यामुळे त्यांच्या गालाला तलावर लागल्याचं नानलपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणात गोंधळ उडल्यानंतर परभणीतील नानालपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत प्रकरण शांत केलं. त्यानंतर दोन्ही गटांनी परस्पर तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement