Shashikant Bhosale : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता; नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काल दुपारी ते पुण्याहून सातारला जाण्यासाठी निघाले होते.
![Shashikant Bhosale : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता; नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय state joint director general of marketing shashikant ghorpade missing suspected to have jumped into neera river Shashikant Bhosale : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता; नीरा नदीत आत्महत्या केल्याचा संशय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/13/9118be5d59dfd4d65f23d86c1adc4a171665656450099442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shashikant Bhosale : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) बेपत्ता झाले आहेत. त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या (suicide) केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काल (12 ऑक्टोबर) दुपारी ते पुण्याहून सातारला जाण्यासाठी निघाले. मात्र पुण्याहून पुढे आल्यावर त्यांनी सारोळा गावाजवळ गाडी पार्क केली आणि तिथून पुढे ते चालत नीरा नदीच्या दिशेने चालत गेल्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. त्यामुळे आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. काल दुपारी ते पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यानंतर शशिकांत घोरपडे यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नीरा नदीच्या पात्रात शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु आहे.
शेवटचे लोकेशन शिरवळ
शशिकांत घोरपडे बेपत्त असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. गुरुवारी (13 ऑक्टोबर) पहाटे नातेवाईकांनी ही तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात नीरा नदीच्या जवळ एका हॉटेलपासून एक व्यक्ती पुलाकडे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शशिकांत यांनीच नदीपात्रात उडी मारल्याचं स्पष्ट होत नाही. घटनास्थळी मिसिंग अधिकाऱ्याचे नातेवाईक यासह राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले आहेत. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जलआपत्ती असे एकूण 45 अधिक शोध घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)