Chandrakant Patil : राज्य सरकारनं कायदा मोडणाऱ्यांना साथ देणं बंद करावं : चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडी सरकारनं कायदा मोडणाऱ्यांना साथ देणं बंद करावे. राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत असल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
Chandrakant Patil : भोंग्यांच्या मुद्यावरुन सध्या राज्याती वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार आणि एका आमदारावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं कायदा मोडणाऱ्यांना साथ देणं बंद करावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक देखील प्रसिद्ध केलं आहे.
राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत आहे
दरम्यान, महाविकास आघाडीने संविधानाची चौकट आलांडणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. त्याचे पालन करावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरेंवर महाविकास आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. उलट या आदेशाचे उल्लंघन करुन लाउडस्पीकर वापर करणाऱ्यांवर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारची भूमिका ही कायद्याचे राज्य उल्लंघन आणि संविधानाची अपमान करणारी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे म्हणजे राज्यात अराजकता निर्माण करण्यासारखे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीने संविधानाचा आदर केला पाहिजे, तसेच कायद्याचे पालन करुन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे लावले जात आहेत. काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: