एक्स्प्लोर

भाजपच्या 'या' सहा मंत्र्यांना का मिळाला डच्चू, काय आहेत कारणं?

प्रकाश महेता आणि विष्णु सावरा यांच्या कारभारावर अनेकदा बोटं उठली होती. मेहता यांच्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्री देखील अडचणीत आले होते. तर सवरा यांच्या आदिवासी विभागावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते.

मुंबई :   राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला.  याचवेळी तीन कॅबीनेट आणि तीन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांनी या सहाही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग आणि खणीकर्म, पर्यावरण तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश आहे. प्रकाश महेता आणि विष्णु सावरा यांच्या कारभारावर अनेकदा बोटं उठली होती.  मेहता यांच्यामुळे मागील अधिवेशनात मुख्यमंत्री देखील अडचणीत आले होते. तर सवरा यांच्या आदिवासी विभागावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. प्रकाश महेतांना एम पी मिल कंपाऊंड प्रकरण भोवलं प्रकाश महेता यांना एम पी मिल कंपाऊंड प्रकरण चांगलंच भोवलं. या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाचा दुरुपयोग झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येताच मुख्यमंत्र्यांनी लोकयुक्तांची चौकशी लावून यातून हात झटकले. लोकायुक्तांच्या चौकशी अहवालातही महेता यांचा कारभार पारदर्शी नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांच्या अडचणी वाढल्या. यामुळे मुंबईतला गुजराती चेहरा आणि मोदी - शाह यांच्याशी असलेले जवळचे संबंधही कमी आले नाही. त्यामुळे अखेर महेता यांना गृहनिर्माण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आदिवासी विकास विभागाचा झिरो परफॉर्मन्स आदिवासी विकास विभागाचा झिरो परफॉर्मन्स असल्याने विष्णू सवरा यांना डच्चू देण्यात आला. पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सवरांची कामगिरी निराशाजनक राहिली. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी पाड्या वस्त्यांवर आरएसएसचं मोठं जाळं असूनही लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार आयात करण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. इतकंच नाही तर श्रीनिवास वणगांच्या बंडामुळे पालघरची जागा लोकसभा निवडणुकीत अखेर शिवसेनेला सोडावी लागली. याखेरीज सवरा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. नैतिक जवाबदारी स्वीकारून प्रवीण पोटेंचा राजीनामा प्रवीण पोटे हे अमरावतीचे पालकमंत्री असूनही तिथे तर युतीला नवनीत राणांकडून पराभव पत्कारावा लागला.  या पराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारून प्रवीण पोटे ह्यांनी आधीच मुख्यमंत्र्यांना राजीनामा  पाठवला होता. बडोले आणि आत्रामांचं मतदारसंघात दुर्लक्ष अंबरीश आत्राम हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. तिथे लोकसभेला इतर क्षेत्रांपेक्षा त्यांच्याच अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपला सर्वात कमी मताधिक्य मिळाले.  तर बडोले हे भंडारा गोंदियाचे पालकमंत्री असूनही त्यांच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात लोकसभेत भाजपला  सर्वात कमी लीड मिळाला. मुख्यमंत्र्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारी दरम्यानच आमदारांचे रिपोर्ट कार्ड दिले होते. त्यात ह्या तिघांकडून आपला परफॉर्मन्स जास्त चांगला करावा ही अपेक्षा असल्याचा शेरा मिळाल्याची माहिती आहे. पक्षापासून ते सामान्य माणसांशी 'महाराज' ह्याच भावनेतून वावरणाऱ्या आत्रामांविषयी बरीच नाराजी होती. ज्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असे म्हणावे लागेल. बडोले ह्यांच्या बाबतीत ते सर्वांचे काम करत नाही, विशिष्टच लोकांची कामे होतात अशी भावना ही कार्यकर्त्यांत झाली होती. येत्या काळात विधानसभेत भंडारा गोंदियातून विधान परिषद आमदार असलेले आणि आता मंत्री झालेले परिणय फुके ह्यांची जबाबदारी वाढवण्याचे मनसुबे मुख्यमंत्र्यांचे आहेत. बडोले ह्यांना काढून फुकेंसाठी मंत्रिमंडळात जागा केल्याचे बोलल्या जात आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भाने भाजपला भरभरून यश दिले आणि परिणामी इतिहासात कधी ही न मिळाल्या इतक्या जागा मंत्रिमंडळात विदर्भाच्या आमदारांना मिळाल्या. मात्र आजच्या कॅबिनेट विस्तारात प्रवीण पोटे, राजकुमार बडोले आणि अंबरीश आत्राम हे विदर्भाचे तीन मंत्री बाद करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget