एक्स्प्लोर
ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी, एसटी कर्मचारी संपावर जाणार!
सहा मान्यताप्राप्त संघटना या संपात सहभागी होणार असून 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजे 17 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर जातील.
धुळे : ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. सहा मान्यताप्राप्त संघटना या संपात सहभागी होणार असून 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजे 17 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी संपावर जातील.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या तीन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचाऱ्यांचा कौल
सर्व संघटना समावेशक असलेल्या या संपामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका संपात सहभागी संघटनांनी घेतली आहे. 26 मे 2017 रोजी राज्यातील प्रत्येक एसटी आगारात संपाच्या संदर्भात मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. संपाच्या बाजूने 90 टक्के कर्मचाऱ्यांनी कौल दिला होता.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा इतिहास
यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा सर्व संघटना समावेशक असा 12 दिवसांचा संप 1972 मध्ये झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 आणि आता 2017 मधील हा सर्व संघटना समावेशक संप आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 7 हजार एवढी आहे. तर 17 हजार एवढ्या एसटी बस आहेत. राज्यात 258 आगार आणि 31 विभागीय कार्यालय आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement