एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE: एसटीचा संप: सकाळपासून कामावर हजर न झाल्यास तातडीने निलंबन
राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 7 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे. एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.
धुळे : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. 17 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
या संपात मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपात कामगार सेना सहभागी होणार नाही. कामगार सेनेचे कर्मचारी कामावर जातील.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप LIVE UPDATE
- उद्या सकाळपासून कामावर हजर न झाल्यास तातडीने निलंबन, एसटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा इशारा
- कामावर रुजू होण्याचं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावलं, कर्मचारी संघटना संपावर ठाम, प्रवाशांची प्रचंड गैरसोय
- एसटी कर्मचाऱ्यांना 5 वाजेपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश,अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, ST महामंडळाकडून परिपत्रक जारी
- एसटी संप हा सरकारने लादलाय, पण आजही आम्ही वाटाघाटीसाठी तयार: जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, इंटक
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर,सातव्या वेतनसाठी पैसे नाहीत, पुढील 25 वर्षे सातवा वेतन आयोग लागू करणं अशक्य : दिवाकर रावते (व्हिडीओ)
"कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने संप चुकीचा ठरवलाय,
संप मागे न घेतल्यास कोर्टाच्या आदोशाप्रमाणे कारवाई होईल",
एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांची माहिती
यवतमाळ जिल्ह्यातील एसटी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. जिल्ह्यात एसटीचे 9 आगार असून साधारण 2800 कर्मचारी आहेत आणि बहुतांश कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. नाशिक: वेतनवाढीच्या मुद्दयावरुन एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळं नाशिकमध्येही प्रवासी वाहतूक ठप्प राहिली. सोमवारी मध्यरात्रीपासूनच एसटी बंद झाल्यानं दिवाळ सणासाठी गावी निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले कल्याण एसटी डेपोमध्ये कामगारांचा संप, पहाटेपासून अनेक प्रवासी डेपोत खोळंबले मुंबई: एसटी संपावरुन खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना सवाल, ऐन दिवाळीत प्रवाशांच्या होणाऱ्या हालाला जबाबदार कोण? #एसटीसंप https://twitter.com/supriya_sule/status/920147026964201472 कोल्हापूर: कागल बस डेपोत अज्ञातांची एसटीवर दगडफेक बीड: अंबाजोगाईत परीवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पुतळा जाळला ऐन सणासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईतल्या मुंबई सेंट्रल डेपोतून रात्री 11 नंतर एसटी बसेस गाड्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. धुळ्यामध्ये एसटी कर्मचारी संघटनाच्या दोन गटांमधला वाद पाहायला मिळाला...शिवसेनाप्रणित एसटी कर्मचारी संघटनेच्या चालकांनी डेपोतून गाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला..त्याला संपावर असलेल्या इतर संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी बांगड्या दाखवल्या. मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. सातवा वेतन आयोग तातडीनं लागू करा, शासकीय पदाप्रमाणे भत्ते द्या यासह अनेक मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात संपाला सुरुवात अहमदनगरला एसटी कामगार संघटनांनी मध्यरात्रीपासून चक्का जाम पुकारला आहे. कामगारांच्या संपाने ऐन दिवाळीत जिल्ह्यातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. संपात इंटक आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह चार संघटनांनी सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात चार हजार तीनशे कर्मचारी आहेत. मात्र संपात साधारण दोन हजार कामगार सहभाग घेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अकरा डेपो असून साडे सातशे बस धावतात. साधारणपणे एका दिवसाला दोन हजार फेर्या करतात. एका दिवसाला 55 ते 70 लाखापर्यंत उत्पन्न जातं. मात्र एसटी वाहतूक ठप्प झाल्याने एसटीचं उत्पन्न बुडणार आहे. त्याचबरोबर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. जिल्ह्यातून मुंबई, पुणे, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र बस धावतात. त्याचबरोबर मध्यप्रदेश, गुजरातसह परराज्यातही बस जातात. कामगार संघटनांच्या संपाने शिर्डी, शनी शिंगणापूरच्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम होणार आहे. अहमदनगरला तारकपूर डेपोतून 254 फेर्या, कोपरगाव 139, श्रीरामपूर 188, संगमनेर 155, तर पारनेर 143, जामखेड 117, पाथर्डी 148, अकोले डेपोतून 128 फेर्या होतात. त्याचबरोबर नेवासा 105, शेवगाव 154, श्रीगोंदा आगारातून 212 फेर्या होतात. मात्र कामगार संघटनांच्या संपाने या फेर्या रद्द होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :- एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी
- राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे.
- दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.
- एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement