एक्स्प्लोर
Advertisement
एसटी किती वेळात येणार, ते मोबाईलवर समजणार!
अनधिकृत थांब्यांना देखील आता आळा बसणार आहे. यासाठी लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात येणार आहे.
धुळे : ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी आता हायटेक होणार आहे. इतकंच नाही तर अनधिकृत थांब्यांना देखील आता आळा बसणार आहे. यासाठी लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात येणार आहे.
एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता आपली एसटी कुठपर्यंत आली, याचा माग मोबाईल अॅपद्वारे घेणं सहज शक्य होणार आहे. एसटी गाड्यांमध्ये ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ बसवण्यात येणार आहे. यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्याबरोबरच स्थानक आणि आगारात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसवले जातील.
एसटीचं वेळापत्रक सुधारण्यासाठी तसेच अनधिकृत थांब्यांना आळा घालण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ या यंत्रणेवर एसटी महामंडळाकडून काम केलं जात आहे. महामंडळाला आपल्या कार्यालयीन कामाबरोबरच प्रवाशांना बसची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी देखील ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे.
यंत्रणा राबवताना त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महामंडळाने ही यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला. निविदा काढून याचे कामही एका कंपनीला देण्यात आलं आहे. कंपनीकडून बस स्थानक, आगारांचे सर्व्हेक्षण केलं जात आहे.
दिवाळीपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ही सुविधा यशस्वी झाल्यास टप्प्याटप्यात राज्यातील सर्व बस आगार आणि स्थानकांत राबवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
पहिला प्रयोग नाशिक विभागात
या यंत्रणेचा पहिला प्रयोग नाशिक विभागात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या विभागात नवीन यंत्रणा राबवताना राहणाऱ्या त्रुटी, अडचणी आणि प्रवाशांची मते घेऊन त्यात आणखी सुधारणा केल्या जातील आणि त्यानंतरच राज्यातील इतर एसटी आगार, स्थानकांत ती राबवली जाणार आहे.
त्यासाठी एसटीच्या प्रत्येक विभागात स्वतंत्र नियंत्रण कक्षही स्थापन केला जाणार आहे. दिवाळीपासून किंवा त्याआधी ही यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. राज्यात राबवण्यात येणाऱ्या या यंत्रणेचा एकूण खर्च 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या यंत्रणेमुळे बसची येण्याची अचूक वेळ, त्याचा ठावठिकाणा प्रवाशांना समजू शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement