बीडमध्ये ST बसच्या धडकेत पती-पत्नी ठार, तर नवी मुंबईत क्रेनच्या धक्क्याने ट्रॅफिक पोलिसाचा मृत्यू
अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावरील (Ahilyanagar Ahmedpur Highway) पाटोदा (Patoda) इथं भरधाव एसटी बसने (ST Bus) दुचाकीस्वराला धडक दिली आहे. या अपघातात (Accident) पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत.

Accident News : अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावरील (Ahilyanagar Ahmedpur Highway) पाटोदा (Patoda) इथं भरधाव एसटी बसने (ST Bus) दुचाकीस्वराला धडक दिली आहे. या अपघातात (Accident) पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. बाळू वाईकर आणि लता वाईकर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी गावचे रहिवासी आहेत. आठवडी बाजारासाठी पाटोदा येथे येत असताना ग्रामीण रुग्णालयासमोर एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात बस खाली आल्यानं या दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हायड्रा क्रेनचा धक्का लागल्याने नवी मुंबई वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू
नवी मुंबई पोलिसांच हृदय पिळवटून टाकणारी एक दुःखद घटना घडली आहे. नवी मुंबईतील महापे ब्रिज खाली गणेश आत्माराम पाटील हे त्यांच्या कर्तव्यच्या हद्दीतील वाहतूक सुरळीत करत असताना हायड्रा क्रेनचा त्यांना धक्का लागला आहे. या धक्यात ते खाली पडले आणि क्रेनच चाक डोक्यावरुन गेल्याने वाहतूक कर्मचारी गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. हायड्रा क्रेन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:























