एक्स्प्लोर
'दहावीच्या वेळापत्रकात बदल करा'
मुंबई: दहावीची बोर्डाची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2016 दरम्यान होत आहे. मात्र चार पेपर सलग येत असल्यामुळे बोर्डाच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.
महत्त्वाच्या पेपरदरम्यान सुट्टी मिळावी, असं विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे.
एसएससीची परीक्षेचं वेळापत्रक 28 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलं. 20 ते 23 मार्च 2017 या दरम्यान दहावीचे चार पेपर सलग आहेत. त्यामध्ये विज्ञान भाग 2, इतिहास-नागरिक शास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र आणि आयसीटीचा (Information and Communication Technology) पेपर आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना या पेपरच्या दरम्यान सुट्टी हवी अशी मागणी होत आहे. शिक्षण परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी दहावीच्या वेळापत्रकात बदल करा, अशी मागणी बोर्डाकडे केली आहे. त्याबाबतचं पत्र त्यांनी बोर्डाला पाठवलं आहे.
बोर्डानेही वेळापत्रक जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत हरकती मागवल्या आहेत. पण वेळापत्रकात कोणताही बदल करता येणार नाही असं राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च 2017 दरम्यान होणार आहेत.
दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement