एक्स्प्लोर
दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2017 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च 2017 दरम्यान होणार आहेत. तर दहावीची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च या कालावधीत पार पडेल, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे ही परीक्षा घेतली जाणार आहे.
दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement