एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

स्पेशल रिपोर्ट: सारंगखेड्याच्या घोडाबाजाराचं कौतुक का?

नंदुरबार: वेगवेगळ्या जातीचे, रंगांच, ढंगाचे, इम्पोर्टेड महागडे घोडे पाहायचे असतील, तर तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड्यात यावं लागेल. 400 हून अधिक वर्षांची परंपरा असलेली कदाचित भारतातली ही एकमेव घोड्यांची यात्रा आहे. कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या सारंगखेड्याच्या या ऐतिहासिक घोड़े बाजारावर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट. घोड्यांच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध सारंगखेडा, घोड्यांच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध ठिकाण. प्रत्येकाची जात वेगळी, प्रत्येकाचा रंग वेगळा आणि प्रत्येकाचा रुबाबही वेगळा. या बाजारात प्रत्येक वर्षी करोडोंची उलाढाल होत असते. तापी नदीच्या काठावर वसलेल्या सारंगखेडा या गावात गेली चारशे वर्ष हा घोड्यांचा बाजार भरतोय. त्यामुळे या बाजाराला त्याचा विशेष असा इतिहासही लाभलाय. राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा बिहार याचसोबत दक्षिण भारतातूनही इथे घोडे व्यापारी येत असतात, यंदा तर सुमारे साडे तीन हजार घोडे बाजारात दाखल झालेत. Sarangkheda horse, ghodabajar 1 घोडेस्वारीचं प्रशिक्षण सारंगखेड्याच्या यात्रेत फक्त घोड्यांची खरेदी विक्री होत नाही तर घोडेस्वारीचं प्रशिक्षणही दिलं जातं. घोडे कसे सांभाळायचे, चालवायचे, पळवायचे हे सर्व इथे शिकवलं जातं. इथे घोड्यांनाही आणि माणसांनाही प्रशिक्षण दिलं जातं. राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार सह दक्षिणेतूनही अनेक व्यापारी, घोडे शौकीन ग्राहक घोडे खरेदीसाठी सारंगखेड्याला दरवर्षी पिढ्यानपिढ्या नित्यनियमानं येतात. मारवाड, काठेवाडी, पंजाब, मारवाड या भारतीय प्रजातींच्या घोड्यांसाठी सारंगखेडा प्रसिध्द आहे. आजच्या मितीला 10 लाखापासून दीड कोटीपर्यंतचे घोडे तुम्हाला इथे पाहायला मिळतील.. तब्बल दीड कोटींची किम्मत लावली गेलेली पद्मा घोड़ी तर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतेय. Sarangkheda horse, ghodabajar 5 घोड्यांचा खुराक आता इतके महागडे घोडे म्हटलं म्हणजे त्यांचा खुराकही तितकाच तगडा. इतक्या महागड्या घोड्यांना सांभाळणं आणि मोठ करणं तितकंच अवघड आहे. 10 लीटर दूध, 40 अंडी आणि काही किलो खाद्य रोज दिल्यावर असे घोड़े आकाराला येतात. नोटबंदीचा परिणाम सारंगखेड्याच्या यात्रेवरही झाल्याचा पाहायला मिळतो. दरवर्षी पेक्षा यंदा 70 टक्के व्यवसाय कमी झाल्याच व्यापारी सांगतात. महागडा घोडा खरेदी करायचा तर त्याचा डौलही तसाच राजेशाही हवा. आपल्या लाडक्या घोड्याला सजवण्यासाठी वेगवेगळी आभुषणं खरेदी करायलाही व्यापारी गर्दी करतात. Sarangkheda horse, ghodabajar 5 स्पेशल रिपोर्ट: सारंगखेड्याच्या घोडाबाजाराचं कौतुक का? सिंग इज ब्लिंग बॉलिवूड आणि घोड्यांचं अतूट नातं आहे. शोलेमधल्या गब्बर सिंगच्या घोडयापासून ते आता सिंग इज ब्लिंग मधल्या अक्षक कुमारच्या टायटल साँगपर्यंत सगळीकडेच घोड्यांची क्रेझ आहे. सिंग इज ब्लिंग मधला हाच घोडा सारंगखेड्याच्या यात्रेत अवतरला आहे. कधीकाळी या बाजाराला प्राणीप्रेमींनी विरोध दर्शवला होता मात्र या यात्रेतून मिळणाऱ्या महसुलामुळे हा विरोध मोडून काढला गेला आणि यात्रा अबाधित राहिली. भविष्यात या भागात पर्यटन स्थळ व्हावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आणि सढळ हस्ते मदतीचा हातही पुढे केलाय.  या यात्रेसाठी खास 50 लाख रुपये मंजुर करण्यात आले. भविष्यात जागतिक अश्व संग्रहालय उभारायचं, सह्याद्री सापुता-याच्या घोडेस्वारीची व्यवस्था उभी करुन घोड्यांच्या खेळांचे आयोजन करण्यासारखे कार्यक्रम करण्याचा मनोदय आहे. Sarangkheda horse, ghodabajar 4 तापीच्या काठावर वसलेली आणि जगभरात आगळं वेगळं स्थान निर्माण केलेली ही यात्रा यापुढेही घोड्यांच्या टापांच्या आवाजात अशीच दुमदुमत राहील हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaPriyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Embed widget