एक्स्प्लोर
सासऱ्याच्या नाकाला जावयाचा कडकडून चावा, नाकाचा शेंडा तुटला
मारहाण सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या सासऱ्याच्या नाकाला जावयाने चावा घेतल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. जावयाने चावा घेत नाकाचा तुकडाच पाडला आहे.
लातूर : आपल्या मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या सासऱ्याच्या नाकाला जावयाने चावा घेतल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. जावयाने चावा घेत नाकाचा तुकडाच पाडला आहे.
संतोष यादव या जावयाने सासरे नागनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. लातूर जिल्ह्यातील भादा गावातील ही घटना आहे.
व्यवसायाने आचारी असलेला संतोष दारुच्या आहारी गेला आहे. त्याला तीन अपत्य आहेत. संतोष पत्नीला कायम मारहाण करतो. यामुळे कायम तणावाखाली राहणारी पत्नी लहान बाळाला घेऊन माहेरी आली. तिला नेण्यासाठी तो भादा या गावी आला.
भादा गावी आला तेव्हाही संतोष दारुच्या नषेत होता. त्याने आल्या आल्या पत्नीला मारहाण सुरु केली. सासरे नागनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि या झटापटीत संतोषने नागनाथ यांच्या नाकाला कडकडून चावा घेतला. यात त्यांच्या नाकाचा शेंडा तुटला आहे.
नागनाथ शिंदे हे जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संतोषविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement