एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, नामविस्तार कार्यक्रमात धनगर कार्यकर्त्यांच्या गोंधळ
नामविस्ताराच्या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या भाषणादरम्यान धनगर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. नामविस्तारासाठी सुभाष देशमुख यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. मग ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कसे असू शकतात? असा आरोप धनगर कार्यकर्त्यांनी केला.
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत अनेक वर्षांपासूनच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं नामांतर करण्यात आलं आहे. धनगर समाजाने पारंपरिक गजा ढोल वाजवत जल्लोष केला.
जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, राज्यसेभेचे खासदार विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला. मात्र पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कार्यक्रमाला दांडी मारली.
अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या सोलापूर विद्यापीठ नामविस्ताराच्या लढ्याला आज यश मिळालं. त्याचा हा आनंद सोहळा असल्याचं मत राम शिंदेंनी व्यक्त केलं. तसंच धनगर समाजच्या अन्य मागण्यांचाही सरकार सकारात्मक विचार करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. लिंगायत समाजाची याचिका असताना नामविस्तराची घाई का? असे विचारले असता सरकारला असलेल्या अधिकारांचा वापर करत कायदेशीर प्रक्रिया पार पडल्याचं राम शिंदेंनी सांगितलं.
दरम्यान नामविस्ताराच्या कार्यक्रमात गोंधळही पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या भाषणादरम्यान धनगर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सुभाष देशमुखांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, मात्र तरीही त्यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं.
नामविस्तारासाठी सुभाष देशमुख यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. मग ते कार्यक्रमाचे अध्यक्ष कसे असू शकतात? असा आरोप धनगर कार्यकर्त्यांनी केला. राज्य सरकार कोणत्याही समुदायावर अन्याय करणार नाही. लिंगायत समाजातर्फे सोलापूर विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी आहे, त्यावरही सकारात्मक विचार करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
या नामविस्ताराला लिंगायत समाजाचा विरोध होता. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे नाव देण्यात यावे अशी शिवा संघटनेची मागणी होती. नामविस्ताराच्या घोषणेनंतर काल सोलापुरात शिवा संघटनेने मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला.
आजच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शिवा संघटनेचे शहराध्यक्ष शरणबसप्पा केंगणाळकर, कांचन फाउंडेशनचे सुदीप चाकोते यांच्यासह 7-8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रम झाल्यावर त्यांची सुटका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement