Ujani Dam : दिलासादायक! तीन जिल्ह्यासाठी वरदान असलेलं उजनी धरण अखेर प्लसमध्ये
Solapur Ujani Dam Latest Update: 7 जुलैपासून आतापर्यंत उजनी धरणात जवळपास सात टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे उजनी हे प्लसमध्ये आलं आहे. मागच्या वर्षी हे धरण 22 जुलै रोजी प्लसमध्ये आलं होतं.

Solapur Ujani Dam Latest Update: पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे काल रात्री प्लसमध्ये आले आहे. काल रात्री 9 वाजता उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा 63.25 टीएमसी इतका आहे. मागच्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. 7 जुलैपासून आतापर्यंत उजनी धरणात जवळपास सात टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे उजनी हे प्लसमध्ये आलं आहे. मागच्या वर्षी हे धरण 22 जुलै रोजी प्लसमध्ये आलं होतं. यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 9 दिवस आधीच प्लस मध्ये आलं आहे. धरणाची क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे. सध्या उजनी धरणात 3 टक्के जिवंत पाणी साठा आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सर्वदूर पाऊस
सोलापूर जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून सर्वदूर पाऊस कोसळत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 173 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सरासरी 142 मिलिमीटर इतकी असताना अधिकचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे सलग पाऊस सुरू असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत त्यांची मात्र अडचण होतेय.
शहरात अनेक ठिकाणी खड्डे असल्याने बहुतांश ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सुदैवानं जिल्ह्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त प्रशासनाकडे नाही. दरम्यान सोलापूर जिल्ह्यासाठी पाण्याचे मुख्य साठा असलेले उजनी धरण बऱ्याच दिवसानंतर प्लसमध्ये आल्याने सर्वसामान्य लोकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Mumbai Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स
Maharashtra Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
