एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

तेलंगणातील महबूबनगर मोठी दुर्घटना टळली, पुराच्या पाण्यात बुडालेल्या स्कूल बसमधून 30 मुलांची सुखरुप सुटका

तेलंगणाच्या महबूबनगरमध्ये पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली आणि हळूहळू बुडू लागली. यामुळे बसमधील 30 मुलांचा जीव धोक्यात आला होता. परंतु नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व मुलांची सुखरुप सुटका केली.

महबूबनगर : तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात आज (8 जुलै) मोठी दुर्घटना टळली. महबूबनगरमध्ये स्कूल बस 30 मुलांना घेऊन जात होती. या दरम्यान, मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यान पुलाखालील पुराच्या पाण्यात ही स्कूल बस अडकली. यामुळे बसमधील 30 मुलांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व 30 मुलांना सुखरुप वाचवले आणि मोठी दुर्घटना टळली. भश्याम शाळेची ही स्कूल बस रामचंद्रपूर, मचनपल्ली, सुगुरगद्दाफी तांडा इथून मुलांना घेऊन महबूबनगर शहरातील भश्याम टेक्नॉलॉजी स्कूलकडे निघाली होती.

सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. स्कूल बस 30 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यानच्या रेल्वेच्या अंडरब्रिजमध्ये बुडाली. पाणी इतकं खोल असेल आणि त्यात बस अडकेल, याची चालकाला थोडीशीही कल्पना आली नाही. चालकाने बस पुढे नेली आणि ती पुराच्या पाण्यात अडकली आणि हळूहळू बुडू लागली. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी तत्परता दाखवून मदतीचा हात पुढे केला, अशी माहिती महबूबनगरचे पोलीस उपायुक्त यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास अर्धी बस पाण्यात बुडाली होती. त्यानंतर चालकाने बस थांबवली. सुदैवाने सर्व मुलांची सुखरुप सुटका झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये लोक शाळकरी मुलांना बसमधून बाहेर काढताना दिसत आहेत. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली.

दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये 7 जुलै रोजी अशीच एक घटना घडली होती. एक स्कूल बस पाण्यात वाहू लागली. लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली आणि तातडीने बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बसमध्ये अडकलेल्या मुले, चालक आणि इतर दोघांची सुटका केली.

महबूबनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यभर मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. रंगारेड्डी, मेडचल-मलकाजगिरी, यदाद्री-भोंगीर, कामरेड्डी, जानगाव, राजन्ना सिरसिल्ला आणि जगतियाल यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला. निजामाबाद जिल्ह्यातील मेंदोरा येथे मंगळवारी (5 जुलै) सर्वाधिक 108.3 मिमी पाऊस झाला होता.

जगतियाल, राजन्ना सिरसिल्ला, करीमनगर, पेड्डापल्ली, वारंगल (ग्रामीण), आणि वारंगल (शहरी) यासह काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget