एक्स्प्लोर

Maharashtra Mumbai Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स

Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Mumbai Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स

Background

Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. आताच्या माहितीनुसार  ताज्या रडार आणि सॅटेलाइट ऑब्सनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2.3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये (Palghar) दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार  दिनांक 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिले आहे

पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट (Pune Rain Update)

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पीक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

खडकवासला (khadakwasla Dam) 100 टक्के भरलं, 5992 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू

मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. आज दुपारी 12 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 3424 क्युसेक विसर्ग वाढवून  5992 क्युसेक करण्यात येत आहे.

वर्धा (Wardha) जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन

वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14 जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मिमि म्हणजे 42.9 टक्के (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झालेलं आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा धरण 11 जुलै रोजी 60.36 टक्के भरलेले असून, सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने येत्या 72 तासांत येणाऱ्या येव्या नुसार पुराचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडू नये. निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले असून, त्यामधून 178.73 (घन.मी./से) पाण्याचा विसर्ग सूरु असल्याने वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट (Gadchiroli Rain Updates)

मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे.

मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Mumbai Rain)

मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा अद्याप मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.

बारामती (Baramati) परिसरात दमदार पाऊस

इंदापूर शहरासह तालुक्यामध्येही हलक्या व मध्यम स्वरूपात पावसानं हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र मागच्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने उजनी धरणात देखील साडेपाच टीएमसी पाणी साठले आहे. 

यवतमाळमध्ये (Yavatmal) संततधारा सुरू, अर्णी शहरात पाणी शिरले

यवतमाळमधील उमरखेड तालुक्यात काल संध्याकाळपासून सतंतधार पाऊस सुरू आहे. पुसद दहागाव जवळील पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने रास्ता बंद करण्यात आला आहे. मागील वर्षी याच पुलावर बस पाण्यात पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. शासनाने नवीन पूल बांधला पण त्याबाजूने रस्त्यावर पाणीच पाणी आहे. उमरखेड ढाणकी झाडगाव उजाड जवळ असलेल्या नाल्यास पाणी आल्याने हा रस्ताही बंद करण्यात आला.

दोन दिवसापासून आर्णी शहरात जोरदार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. मध्यरात्री पासून पावसाचा चांगलाच जोर वाढल्याने शहरातील अरूनावती नदी दोन्ही थड्या भरून वाहत आहे. अशातच या नदीचा प्रवाहाचे पाणी नाल्यात आल्याने नाल्यांना पूर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले. 

भंडारदरा आणि निळवंडे दोन्ही धरण 50 टक्के भरली (Ahmednagar Rain)

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारादरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाचा वेग वाढल्याने भंडारदरा आणि निळवंडे हे दोन्ही धरण निम्मे भरले आहेत. तसेच अकोले तालुक्यातील टिटवी लघू पाटबंधारे प्रकल्प सोमवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. या जलाशयाची साठवण क्षमता 303 दलघफू आहे. टिटवी जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून निळवंडे धरणात नवीन पाणी येऊ लागलं आहे. गेल्या आठवड्यापासून घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे या भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक छोटी धरणं ओव्हरफलो झाली आहेत. 

कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात (Sangli) 

संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढू लागली आहे. कृष्णेची पाण्याची पातळी आज सकाळी 18 फुटापर्यंत गेलेली दिसून आली. अद्याप कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू नसला, तरी देखील केवळ नदीच्या पात्रात पडणाऱ्या पावसाने ही पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे मागील आठवड्याभरापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 50 टक्के भरले आहे.

वाशिममध्ये (Washim) पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर पावसाची हजेरी लावली असून अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. कारंजा तालुक्यातील पाऊस जास्त पडत असला तरी मात्र जिल्ह्यात कुठेही  गावातील पावसाने संपर्क तुटलेला नाही. मात्र चांगला पाऊस बरसत असल्याने बळीराजा मात्र आंनदी आहे

लोणावळ्यात (Lonawala) उच्चांकी पाऊस

लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला. इथं गेल्या चोवीस तासात 220 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत 1522 मिलिमिटर पाऊस बरसलाय. त्यापैकी गेल्या सहा दिवसातंच 952 मिलिमिटर पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळा परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत. 

रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) पावसाची उसंत

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसानं जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार बॅटिंग केली. पण सध्या मात्र पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत होती. या नदीची इशारा पातळी पाच मीटर असून धोका पातळी सात मीटर इतकी आहे. पण सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण असं असलं तरी हवामान विभागांना दिलेला पावसाचा इशारा पाहता नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क आहे. सध्या जिल्ह्यामध्ये NDRF च्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

परभणीत (Parbhani) सलग पाचव्या दिवशी संततधारा

परभणीत सलग 5 व्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. येलदरीत 2.14 टक्के तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र मागच्या सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसतोय. यामुळे पीक चांगली बहरली असून प्रकल्पातील पाणी साठ्यात ही चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना हवा असलेला मूर पाऊस यंदा पडतोय. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत आहे. तसेच येलदरी आणि लोअर दूधना प्रकल्प क्षेत्रात ही चांगला पाऊस होत असल्याने येलदरीत 2.14 टक्के एवढा पाणी साठा वाढलाय तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

औरंगाबादसह (Aurangabad) जालना जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट; जायकवाडी धरणाची आवक वाढली

मराठवाड्यात 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम असणार असून, आज औरंगाबादसह जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पावसाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेत उपाययोजना केल्या जात आहे.

 

22:41 PM (IST)  •  13 Jul 2022

पालघर - वैतरणा नदीत बहाडोली येथे 13 कामगार अडकले

मुंबई वडोदरा महामार्गाच्या फ्लाय ओव्हर ब्रीजच काम सुरू असताना अचानक पूर आल्याने  वैतरणा नदीत बहाडोली येथे 13 कामगार अडकले.  हे सर्व जण स्किल्ड वर्कर असल्याचे सांगण्यात येते.
एन डी आर एफ च्यां टीम ला पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांनी दिली आहे. जीव वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील

22:26 PM (IST)  •  13 Jul 2022

वसई दरड दुर्घटना: मृतांना प्रत्येकी 6 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे  दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

19:39 PM (IST)  •  13 Jul 2022

Beed : पुसरा नदीला पूर आल्याने दहा गावांचा संपर्क तुटला..

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संतधर पावसामुळे अनेक नद्यांना व नाल्यांना पूर आलाय वडवणी तालुक्यातील पुसरा गावच्या नदीला पूर आल्याने तालुक्यातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे पुराचे पाणी सध्या पुलावरून वाहत असल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. आज वडवणीच्या आठवणी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिक वडवणी शहरात आले होते मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्याने नदीला पूर आला आणि याच पुराच्या पाण्यातून गावकऱ्यांना आपली वाट मोकळी करावी लागली

18:19 PM (IST)  •  13 Jul 2022

मोठी बातमी: जायकवाडी धरणात एक लाख क्युसेकने पाण्याची आवक सुरु

Aurangabad Rain Update: नाशिक जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेला विसर्ग आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात 1 लाख 5 हजार 164 क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. तर जायकवाडी धरण तब्बल 48.70 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील जिवंत पाणीसाठा 1057.303 दलघमी आहे. तर फुटामध्ये पाणीपातळी 1511.12 फुट असून, मीटरमध्ये 460.589 मीटर आहे. तर धरण क्षेत्रात सुरु असेलला पाऊस अजूनही सुरुच आहे.

 

 

17:58 PM (IST)  •  13 Jul 2022

रत्नागिरी - जगबुडी नदीच्या प्रवाहात सहा ते सात गुरे अडकली 

रत्नागिरी  - जगबुडी नदीच्या प्रवाहात सहा ते सात गुरे अडकली आहेत.  अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने , शेतात चरण्यासाठी गेलेली पाळीव गुरे अडकली आहेत. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास गुरे वाहून जाण्याची भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget