एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी थेट मतदान केंद्रात घुसले, राष्ट्रवादीचा आक्षेप

पदवीधर मतदान प्रक्रियेदरम्यान सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी पंढरपूर शहरातील मतदान केंद्रात गेल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी घेतला आहे.

सोलापूर : काल झालेल्या पदवीधर मतदान प्रक्रियेदरम्यान सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे पंढरपूर शहरातील द ह कवठेकर प्रशालेत एक मतदान केंद्रात गेल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. काल या मतदान केंद्रावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असताना खासदार जय सिद्धेश्वर स्वामी थेट एक मतदान केंद्रात घुसल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी घेतला आहे.

वास्तविक आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार मतदान प्रक्रियेतील कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसताना भाजप खासदार थेट मतदान केंद्रात गेले होते. यावर आक्षेप घेताच आपणास मतदान केंद्रास भेट देऊन योग्य पद्धतीने मतदान सुरू आहे का? हा पाहण्याचा अधिकार असल्याचा दावा खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे. मतदान शांततेत चाललं आहे का नाही, मतदान केंद्रांवर कोविडचं पालन होतंय की नाही हे पाहण्याचा अधिकार आहे, असं खासदार जय सिद्धेश्वर स्वामींनी म्हटलं आहे. दुसरीकडे आज राष्ट्रवादीच्या वतीने सोलापूर येथे लेखी तक्रार दिली जाणार आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पूर्ण, महाविकास आघाडी की भाजप? भवितव्य मतपेटीत बंद

पाच जागांसाठी काल झालं मतदान

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडली. काल सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर उद्या, 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या मतदानाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघ - श्रीकांड देशपांडे, शिवसेना पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शिक्षक मतदारसंघ - प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजीत वंजारी, काँग्रेस

भाजपचे उमेदवार तर भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार कोण हे जाणून घेऊया

अमरावती शिक्षक मतदारसंघ - डॉ. नितीन धांडे पुणे पदवीधर मतदारसंघ - संग्राम देशमुख पुणे शिक्षक मतदारसंघ - जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - शिरीष बोरनाळकर नागपूर पदवीधर मतदारसंघ - संदीप जोशी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaShrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरणPravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावरMarkadwadi Disputes : बॅलेट पेपरवर मतदान, मारकडवाडीत तणाव; 20 जणांना नोटीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Suresh Mhatre Aka Balya Mama: मोठी बातमी: भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी बातमी: शरद पवारांचा खासदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget