एक्स्प्लोर
खासदारकी धोक्यात आलेल्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यापुढील पर्याय काय?
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत सादर केलेला जातीचा दाखला अवैध ठरला आहे. परिणामी जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात आलीय. कशी असणार पुढची प्रक्रिया जाणून घेऊया.
सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी निवडणुकीसाठी सादर केलेला जातीचा दाखला अवैध ठरला आहे. सोलापूर जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय दिला आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार अक्कलकोट यांना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावाचे बेडा जंगम या जातीचे बनावट मुळ जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश ही समितीतर्फे देण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी जाणार की राहणार? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. काय आहे पुढील प्रक्रिया जाणून घेऊया.
आता पुढील प्रक्रिया काय?
- तहसीलदार, अक्कलकोट हे न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांच्याकडे लिखित फिर्याद दाखल करणार
- या दाखल अहवालानुसार न्यायदंडाधिकारी, सोलापूर(जिल्हाधिकारी) कारवाईचे आदेश देऊ शकतात
- खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात येऊ शकते
- जात वैधता पडताळणी समिती, सोलापूर यांनी दिलेला निकाल अमान्य असून त्यावर स्थगिती करून रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकते
- उच्च न्यायालयात दोन्ही पक्ष तसेच समितीच्या निर्णयावर पुन्हा सुनावणी होऊन निर्णय येईल
- नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार कायदेशीर प्रक्रियेमुळे निकाल येण्यास विलंब होण्याची शक्यता जास्त
- उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही दोन्ही पक्षांकडे सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले असतील
- न्यायालयांच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यावरच निवडणूक आयोग कार्यवाही करणार
- खासदारकीच्या काळात जर जात पडताळणी समितीचा निर्णय कायम राहिला आणि जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले तर आपोआप खासदारकी रद्द होऊन पोट निवडणूक लागण्याची शक्यता
- कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या विरोधात निर्णय आल्यास केंद्रीय निवडणूक आयोग वेतन आणि भत्ते जमा करण्याचे निर्देश देऊ शकतो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement