एक्स्प्लोर

सोलापुरात भाजपला धक्का; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला अवैध

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती.

सोलापूर : सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी निवडणुकीसाठी सादर केलेला जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने हा निर्णय दिला आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार अक्कलकोट यांना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावाचे बेडा जंगम या जातीचे बनावट मुळ जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश ही समितीतर्फे देण्यात आले आहे. तसेच खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात सोलापूर न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तात्काळ लेखी फिर्याद दाखल करण्याचे आदेश ही या निकालपत्रात देण्यात आले आहेत.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी लोकसभा निवडणुकीत 1982 सालचा बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हा दाखला बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंडकुरे यांनी केली होती. त्यावर सोलापूर जिल्हा जात पडताळणी कार्यालयात 15 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर हा निकाल राखून ठेवण्यात आला होता आणि आज तो निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपण सादर केलेला दाखला वैध असल्याचे सांगत सन 1344 आणि 1347 फसली सालातील मोडी लिपीतील नमुना पुराव्यासाठी सादर केला होता. याच्या तपासणीसाठी दक्षता समितीने तपासणी करुन आपला अहवाल सादर केला. या अहवालात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुराव्यासाठी दाखल केलेला नमुनी संशयास्पद असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्त दक्षता समितीमार्फत चौकशी करण्यात यावी असा अर्ज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या वकील अॅड. संतोष नाव्हकर यांनी केला. मात्र जिल्हा जात पडताळणीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पुर्ण झाल्याचे कळविले.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जात पडताळणीबाबतचा निकाल 3 ते 4 दिवसात येण्याची शक्यता

दरम्यान आता तक्रारदार आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य दोघेही उच्च न्यायालयात जाणार आहेत. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या दाखल्याविरोधात उच्च न्यायालयात या आधीच तक्रार दाखल आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीचा हा निकाल तक्रारदारमार्फत उच्च न्यायालयात सादर केला जाईल. तसेच लोकसभेचे सभापती आणि निवडणूक आयोगाकडे देखील हा निकालपत्र सादर करत खासदारकी रद्द करण्यात मागणी करणार असल्याची माहिती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी दिली. तर इकडे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे देखील उच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरोधात दाद मागणार असल्याची माहिती त्यांचे वकील संतोष नाव्हकर यांनी दिली. जात पडताळणी समितीने तक्रारदारांच्या दबावात काम केलं. त्यामुळे समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

सोलापुरातील भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा अल्प परिचय

काय म्हटलं आहे निकालपत्रात?

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा जात वैधता पडताळणी समितीने 34 पानांचा निकालपत्र जाहीर केला आहे. जात वैधता पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ यांच्यासह 5 जणांच्या समितीने हा निकाल जाहीर केला. या निकालपत्राच्या शेवटी 5 निर्णय समितीने जाहीर केले आहेत...

1. सामनेवाला श्री. नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम (अजा.) या जातीचा दावा अमान्य करण्यात येत आहे.

2.तक्रारदार क्र १ ते ३ यांचे तक्रारी अर्ज मंजुर करण्यात येत आहेत.

3. सामनेवाला श्री हिरेमठ नुरंदस्वामी गुरुबसय्या यांच्या नावाचे बेडा जंगम (अजा.) या जातीचे प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट एसआर/क्र. ८२७/१९८२ दि. १५.०१.१९८२ हे अवैध (INVALID) ठरविण्यात येत आहे.

Loksabha Election 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट

4. कार्यकारी दंडाधिकारी, तथा तहसिलदार अक्कलकोट, सोलापूर यांनी सामनेवाला श्री. हिरेमठ नुरंदस्वामी गुरुबसय्या यांच्या नावाचे बेडा जंगम (अजा.) या जातीचे बनावट मुळ जात प्रमाणपत्र कायदयातील तरतुदीनुसार जप्त करण्याची कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीस सादर करावा.

5. तहसिलदार, अक्कलकोट, जि-सोलापूर यांनी महाराष्ट्र अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग व्यक्तीना (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम,२००० मधील कलम ११ {(१) अ,ब} कायद्यातील तरतुदी अन्वये सामनेवाला श्री.नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ उर्फ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी व इतर यांचे विरुध्द मा. न्यायदंडाधिकारी, सोलापूर यांचे न्यायालयात तात्काळ लेखी फिर्याद दाखल करावी.

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
रामदास कदम माझ्या पाया पडले, त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, राष्ट्रवादीत जाण्याची धमकी देऊन विरोधी पक्षनेतेपद पटकावलं, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य 
रामदास कदम माझ्या पाया पडले, त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, राष्ट्रवादीत जाण्याची धमकी देऊन विरोधी पक्षनेतेपद पटकावलं, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य 
रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
Gokul : सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget