एक्स्प्लोर
लग्नाचा तगादा लावल्याने सोलापुरात युवतीची जाळून हत्या
सोलापूर : लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीला प्रियकराने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. यात शंभर टक्के भाजलेल्या प्रेयसीचा मृत्यू झाला आहे, तर प्रियकर आणि त्याचे दोन भाऊ अटकेत आहेत.
सोलापुरातल्या होसनळची ज्योती खेडकर आणि सुदर्शन गायकवाड यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुदर्शननं लग्न करावं असा ज्योतीचा हट्ट होता. मात्र त्यानं नकार दिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिनं स्वतःला पेटवून घेतलं. त्यावेळी प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी सुदर्शननं लग्नाला होकार दिला.
त्यानंतर ज्योती हळूहळू बरी झाली. तिनं पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला, मात्र यावेळी चिडलेल्या सुदर्शननं थेट तिला संपवूनच टाकलं. एप्रिलमध्ये झालेल्या या घटनेनंतर गेले चार महिने ज्योतीचे आईवडील न्याय मिळण्याच्या अपेक्षेने पोलिस ठाण्याचे दरवाजे ठोठावत आहेत. अखेर पोलिसांनी त्यांची दखल घेत सुदर्शन आणि त्याच्या दोन भावांवर हत्येचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement