एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महापौरांना अर्वाच्च भाषा, सोलापुरात स्थायी सभापतींचं निलंबन
गाळे भाडेवाढीच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांशी झालेल्या वादात कोळी यांनी महापौरांसाठी अर्वाच्च शब्द वापरल्याचा आरोप आहे.
सोलापूर : सोलापुरात सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका सभागृहात एकच गोंधळ घातला. महापौरांना उद्देशून अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांचं निलंबन करण्यात आलं.
दूषित पाण्याच्या समस्येवरुन सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन करत महापौर शोभा बनशेट्टी आणि आयुक्तांना धारेवर धरलं. सभागृहाचं कामकाज थांबवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नगरसेवकांच्या प्रचंड गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज काही काळ ठप्प झालं होतं. दरम्यान पालिका आयुक्तांनी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.
स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांचं सभागृहातून निलंबन करण्यात आलं. गाळे भाडेवाढीच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांशी झालेल्या वादात कोळी यांनी महापौरांसाठी अर्वाच्च शब्द वापरल्याचा आरोप आहे. त्यावरुन त्यांच्याविरोधात कारवाई कऱण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement