एक्स्प्लोर

कोविड काळात SDRF निधीत भ्रष्टाचार, सीबीआयमार्फत चौकशी करा; आमदार राम सातपुते यांची मागणी

सीबीआयकडे मी स्वतः तक्रार करणार असे आमदार राम सातपुते यांनी म्हणताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सीबीआय नको ईडीमार्फत चौकशी करु असे म्हणत खिल्ली उडवली.

सोलापूर : कोरोना काळात जिल्हा आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सातपुते यांनी आरोप केल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. 

एसडीआरएफ फंडातून जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या निधीत भ्रष्टाचार झाला आहे. याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. अशी मागणी भाजप आमदार राम सातपुते यांनी केली. सीबीआयकडे मी स्वतः तक्रार करणार असे सातपुते यांनी म्हणताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सीबीआय नको ईडीमार्फत चौकशी करू असे म्हणत खिल्ली उडवली. तसेच जर असे काही झाले असेल तर त्याची चौकशी करण्यास आपल्या यंत्रणा सक्षम असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार संजय शिंदे म्हणाले. 

आमदार सातपुते यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सीबीआय चौकशीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी देखील त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आमदार राम सातपुते सीबीआय चौकशीच्या मागणी करत आहेत, मात्र त्यांच्या माळशिरस मतदारसंघात वंचित समाजातील व्यक्तीला स्मशानभूमी मिळाली नाही. त्याला जबाबदार कोण याची देखील चौकशी करायला हवी असे म्हणत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जोरदार टीका केली. यावरून सभागृहातील वातावरण प्रचंड तापले.

आपण त्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो. ते गाव माझ्या मतदारसंघात देखील नाही असा खुलासा यावेळी आमदार सातपुते यांनी केला. जिल्ह्यातील सर्व आमदारांना वंचिताची मते हवीत. त्यांच्या स्मशानभूमीचे प्रश्न का सोडवत नाही. यावर सर्व आमदारांची एक बैठक व्हायला हवी. अशी मागणी यावेळी आनंद चंदनशिवे यांनी केली. दरम्यान या संदर्भात लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. 

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून देखील मोठा गदारोळ झाला. गाळप हंगाम आता सुरू झाला आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. तसेच गावठाण भाग आणि पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन देखील तोडण्यात येऊ नये अशी मागणी आमदार संजय शिंदे यांनी केली. आमदार शिंदेच्या या मागणीला सर्वपक्षीय आमदार आणि नेत्यांनी समर्थन दिले. सभागृहाच्या भावना लक्षात घेत गावठाण भागाच्या विजेचे कनेक्शन तसेच पाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन तोडू नये अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा मुद्दा हा राज्य शासनाचा असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदाराना सोबत घेऊन येत्या दोन दिवसात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊ. अशी माहिती देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोपABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baburao Chandere : अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
अजितदादांचे पुण्यातील विश्वासू बाबूराव चांदेरेंची दिवसाढवळ्या मोगलाई; दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना अटकेचा मुहूर्त सापडेना
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
समृद्धी महामार्गावर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारू विक्री, वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपघाताचा धोका वाढला
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Embed widget