एक्स्प्लोर

National Film Awards : बार्शीच्या विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'चा दिल्लीत दरवळ, दिग्गजांच्या उपस्थितीत स्विकारला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायुडू,मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते झाले. बार्शीतला दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.

मुंबई : चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली. आज या पुरस्कारांचे वितरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायुडू, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते झाले. यावेळी रजनीकांत यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या पुरस्कारांमध्ये काही मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार मिळाले. या पुरस्कारात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या पोरांनी हवा केली. बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आज विनोदनं हा पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला. बार्शीतला अभिनेता विठ्ठल काळेंच्या काजरोला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याआधी बार्शीतील अमर देवकर यांच्या म्होरक्या या चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  

विनोदच्या 'कस्तुरी'चा दरवळ

इंजिनियरिंग सोडून आवड जपण्यासाठी चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या विनोद कांबळेनं पुन्हा एकदा बार्शीचं नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवलं आहे. विनोद कांबळे लिखित आणि दिग्दर्शित कस्तुरी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विनोदनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टमार्टम करणाऱ्या एका लहान मुलाच्या स्वप्नाची गोष्ट असलेल्या कस्तुरीचा दरवळ आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. याआधीही कस्तुरी सिनेमानं देशासह जगभरातील काही महत्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता त्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व स्थानिक कलाकार आहेत.

संघर्षातून पुढे येत पुरस्कारावर कोरलं नाव

विनोद कांबळेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुरस्कारापर्यंत प्रवास केलाय. विनोद कांबळेची घरची परिस्थिती बेताची. विनोदचे वडील आजही बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यात इंजिनियरिंग सोडून त्याने चित्रपटाची आवड असल्याने मार्ग अवलंबला. विनोदनं याआधीही केलेल्या पोस्टमार्टम या लघुचित्रपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले होते. विनोदने म्होरक्या या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमासाठी देखील सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 

विठ्ठल काळेंच्या काजरो चित्रपटालाही पुरस्कार

बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र असलेल्या विठ्ठल काळे यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या काजरो या कोकणी चित्रपटास यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विठ्ठल काळे यांनी याआधी अनेक हिंदी, मराठी सिनेमांसह काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे पानगावसह सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget