डिसले गुरुजींची आणखी एक सरशी! आता मिळाली अमेरिकन सरकारची 'ही' महत्वाची स्कॉलरशिप
सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत.याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे, असे डिसले गुरुजींनी सांगितले.
जगभरातील प्रतिभावान शिक्षकांना एकत्र आणून जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शैक्षणिक संशोधन करण्याची संधी यामुळे मिळते. अमेरिकेतील शिक्षणपद्धती जवळून अभ्यासण्याची संधी यामुळे मिळते. ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून यंदाचे हे 75 वे वर्ष आहे.
ग्लोबल टिचर पुरस्कारानंतर गुरुजींच्या नावाची देशभर चर्चा
तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून निवड झाली असून त्यांना गेल्या वर्षी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला होता. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले होते. डिसले हे व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील 143 हून अधिक देशातील 1400 पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिसले यांनी 16 हजारपेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून राज्यातील शिक्षकांना त्याचा फायदा होत आहे.
ग्लोबल टिचर्स पुरस्कार नेमका आहे काय?
यात जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरता निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारानंतर देश विदेशातील नामवंत मंडळींकडून डिसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. डिसले गुरुजी यांची जागतिक बॅंकेच्या शिक्षण सल्लागार पदी देखील निवड झालेली आहे.
संबंधित बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI